• Wed. Sep 16th, 2026

Uddhav Thackeray : ‘छावा चित्रपटात भाजपवाल्यांचं काय कर्तृत्व? अण्णाजी पंताचं काही बघायचं असेल तर…’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray : ‘छावा चित्रपटात भाजपवाल्यांचं काय कर्तृत्व? अण्णाजी पंताचं काही बघायचं असेल तर…’, ठाकरे नेमकं काय म्हणाले?

Uddhav Thackeray on BJP : “मी या गद्दारांना सांगतोय, जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शाह लावावं किंवा शिवसेना अदानी लावावं. कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या निर्धार शिबिरात आज भाजप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेवर सडकून टीका केली. “आयुष्यात काही केलं नाही. मग शिवाजी महाराज आमचे, संभाजी महाराज आमचे. अरे आता तो चित्रपट आला आहे छावा. त्या भाजपवाल्यांचं त्यात काय कर्तृत्व आहे? काय केलं काय? जशी इतर लोकं चित्रपट पाहत आहेत तसं तुम्ही पाहत आहात. हा, अण्णाजी पंताचं काही बघायचं असेल तर जरुर जा. बरोबर अण्णाजी पंत यांची परंपरा चालवतोय की नाही, भगव्याला डाग लावतोय की नाही, भगव्यात फूट पाडतोय की नाही ते पाहायला जा”, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

“निवडणूक आयोगाने आपल्यावर अन्याय केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल अजून लागत नाहीय. एक-एक न्यायमूर्ती येतात आणि जातात. पुढच्या वर्षी लवकर या तसे पुन्हा जात आहेत. ही असली लोकशाही घेऊन आपण पुढे जात आहोत. तरीसुद्धा मी ठाम उभा आहे, हातामध्ये मशाल घेऊन. अजूनही एवढं सगळं करुनही, म्हणजे नाव चोरला, पक्ष चोरला, वडील चोरले. कारण ह्यांच्या वडिलांचा पत्ता नाही”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

उद्धव ठाकरेंचा घणाघात

“मी या गद्दारांना सांगतोय, जसं मी माझ्या वडिलांचं नाव अभिमानाने लावतोय, तसं गद्दारांनी शिवसेना अमित शाह लावावं किंवा शिवसेना अदानी लावावं. कारण त्यांच्यासाठी काम चाललेलं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
Gaurav Ahuja : पुण्यात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाची BMW गाडी जप्त होणार? वकिलांकडून महत्त्वाची माहिती
“ही केवळ आपली जिंकण्याची लढाई नाही. आपल्या कशावर विजय मिळवायचा आहे हे आधी ठरवा. निवडणुका येतात आणि जातात. विजय होतो, पराभव होतो, परत विजय होतो. आजच्या शिबिराने मला 1999 च्या शिबिराची आठवण आली. कारण 1995 मध्ये आपलं सरकार होतं. पण काही संपत नाही. पाऊस पडत असतो. मध्ये दुष्काळ पडत असतो. पुन्हा पाऊस पडतो. पुन्हा कोंब येतात. तशी माझी शिवसेना आहे. कुणाला वाटत असेल दुष्काळ. पण बिजं पेरली गेली आहेत. त्या बिजापर्यंत कुणी पोहोचू शकत नाही. पुन्हा नवी वाटचाल करायची आहे”, असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed