• Fri. Mar 6th, 2026

    Uddhav Thackeray : ‘बुरसटलेले हिंदुत्वाचे विचार मान्य नाही, आम्हाला बाबासाहेबांचे संविधान मान्य’, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

    Uddhav Thackeray : ‘बुरसटलेले हिंदुत्वाचे विचार मान्य नाही, आम्हाला बाबासाहेबांचे संविधान मान्य’, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य

    Uddhav Thackeray Speech : “हाच धोका आहे, वन नेशन वन इलेक्शन. त्यांना सर्व एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्यालाही आधी बरं वाटलं होतं. एक विधान, एक निशाण, एक प्रधान. हो पाहिजे. पण त्यांचे बुरसटलेले हिंदुत्वाचे विचार आम्हाला मान्य नाही”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या निर्धार शिबिरमध्ये भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर निशाणा साधला. “आरएसएसचे प्रमुख मोहन भागवत मशिदीत जातात. उद्धव ठाकरे अजून गेलेले नाहीत. पण गेला तर परत त्यांचे नरकातील सर्व पित्र वरती येतील. मोदी म्हणतात, लहान असताना त्यांच्या घराच्या आजूबाजूला ईद साजरी व्हायची. त्यांच्या घरी आजूबाजूच्या मुस्लिम कुटुंबांकडून जेवण यायचं. आता ह्यांच्यासाठी खास बटाट्याची भाजी आणि पुरी बनवून द्यायचे, त्याला आपण काय करायचे? असू शकेल ना, आपण कसे सांगणार? ते ताजिया खालून जायचे तरी तुम्ही हिंदू?”, अशी खोचक टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    “मुसलमानांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेला मत दिलं, कारण कोरोना काळात आपण केलेलं काम. पण आम्ही लगेच हिंदुत्व सोडलं हे फेक नरेटिव्ह केलं. अनेकदा बोलतात काही लोकं की, हिटलर… हिटलर… हिटलर… आहे, साम्य बरंच आहे. हिटलरचं सुद्धा असं म्हणतात की, त्याचं चार पातळीवर त्याचं काम चालायचं. तेव्हा चॅनल नव्हती. पण तेव्हा स्वत:ची बाजू मांडणं हे प्रवक्त्यांचं काम होतं. दुसरं काम म्हणजे दुसऱ्यांवर आरोप करणं, तिसरं विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देणं आणि चौथ म्हणजे अफवा पसरवणं. आहे ना साम्य, दिसतं की नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

    “आता जे काय ह्यांचं चाललं आहे, त्यामध्ये साम्य दिसत नाही का? केवळ आपल्याला भुलवण्यासाठी जय श्रीराम म्हटलं की, हिंदुत्ववादी म्हणून सर्व आयुष्य त्यांच्या चरणी वाहून टाकायचं? आज हे करु तर काहीच शकत नाहीत. ते आज मुंबईला खतम करायला निघाले आहेत, मुंबईचं महत्त्व मारायला निघाले आहेत, मुंबईची अस्मिता पायदडी तुडवत आहेत”, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

    ‘बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान आम्ही मानणार’

    “हाच धोका आहे, वन नेशन वन इलेक्शन. त्यांना सर्व एकाधिकारशाही पाहिजे. सगळे एक. आपल्यालाही आधी बरं वाटलं होतं. एक विधान, एक निशाण, एक प्रधान. हो पाहिजे. पण त्यांचे बुरसटलेले हिंदुत्वाचे विचार आम्हाला मान्य नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेलं संविधान, तेच आम्ही मानणार. एक निशाण म्हणजे तुमचं फडकं नव्हे, तर आमचा डौलाने फडकणारा तिरंगा आहे हे आमचं निशाण आहे. एक प्रधान म्हणजे ईव्हीएम आणि बोगस मतदाराने निवडून आलेला नाही तर लोकशाहीच्या माध्यमातून निवडून आलेला पंतप्रधान हे आम्हाला मान्य आहे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
    Uddhav Thackeray : मोठी बातमी! उद्धव ठाकरे यांच्याकडून आपल्या चुकीची जाहीरपणे कबुली
    “आता कमल हसन म्हणाला की, ह्यांना इंडिया नाही हिंदीया करायचं आहे. भाजप देशात फूट पाडण्याचं काम करत आहे. तोडा, फोडा आणि राज्य करा हे यांचं जे काही चाललं आहे ते गाडण्यासाठी आपल्या हातात भगवा घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून भगवा घ्यायचा आहे. माझा काही स्वार्थ नाही. मुख्यमंत्रीपद गेलं, अरे मी ते सोडून दिलं. माझा कुठेही जडला नाही. कारण माझा प्राण वर्षामध्ये नाही तर तुमच्यामध्ये आहे”, असं उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले.

    चेतन पाटील

    लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील हे सध्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजीटल कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. चेतन यांनी याआधी tv9 मराठी, News18 लोकमत, आपलं महानगर येथे काम केलं आहे.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed