• Tue. Mar 10th, 2026
    आरोपींना ज्यांनी पाठबळ दिलं, त्या सर्वांना सह आरोपी करा; बारामतीत देशमुख कुटुंबियांची मागणी

    Santosh Deshmukh Murder Case Baramati Jan Akrosh Morcha : बारामतीमध्ये सरपंच संतोष देशमुख यांची हत्येप्रकरणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी देशमुख कुटुंबीयांनी आरोपींना ज्यांनी मदत केली त्यांना सहआरोपी करण्याची मागणी केली आहे.

    Santosh Deshmukh : आरोपींना ज्यांनी पाठबळ दिलं, त्या सर्वांना सह आरोपी करा; बारामतीत देशमुख कुटुंबियांची मागणी

    दीपक पडकर, बारामती : बीड जिल्ह्यात ज्या काही चुकीच्या गोष्टी झाल्या, त्या चुकीला चूक म्हटलं गेलं नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढली आहे. सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होण्याअगोदर स्टोअर इन्चार्ज आणि मॅनेजर यांचे २८ डिसेंबर रोजी अपहरण करण्यात आले होते. त्यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई केली असती, तर पुढे कोणत्याही घटना घडल्या नसत्या. बीडमध्ये वाढत्या गुन्हेगारीला राजकीय पाठबळ दिलं गेलं. हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी बारामतीत पत्रकारांशी बोलताना दिली.

    सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ बारामतीत रविवारी ९ मार्च रोजी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सर्व धर्मीय निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चात देशमुख कुटुंबीय सहभागी झाले आहेत.
    Solapur News : तीन वेळा आमदार, दोन वेळा मंत्री; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश, कारणही सांगितलं

    कृष्णा आंधळे अद्यापही फरार, ज्यांनी त्याला अभय दिलं त्यांनी शोधून काढावं –

    सरपंच देशमुख हत्या प्रकरणातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्यापही फरार आहे. या प्रश्नावर बोलताना धनंजय देशमुख म्हणाले की, सदर हत्या प्रकरणातील सर्व सराईत गुन्हेगारांची टोळी होती. ते सर्व पोलिसांबरोबर सर्रास वावरत होते. तो फरार असतानाही तो पोलिसांशी सर्रास वावरत होता. त्याला पोलिसांचे अभय होते. फरार आरोपी यंत्रणेलाच घाबरत नसेल तर तो सर्वसामान्यांना काय घाबरणार असा सवाल उपस्थित करत ज्या लोकांनी त्याला अभय दिलं त्यांनीच त्याला शोधून काढावं, असेही देशमुख म्हणाले.

    संतोष देशमुख यांच्या हत्येच्या तपासाबाबत बोलताना ते म्हणाले, १५७८ पानांचे आरोपपत्र आहे. वकील आणि आम्हाला त्यावर अभ्यास करणे ही अवघड गोष्ट आहे. जो तपास तीन महिन्यांमध्ये यंत्रणा राबवून केलेला आहे. तो तपास आपल्याला अभ्यासणे कठीण आहे. मात्र पुढील तपासाचा जो भाग आहे त्यात काय होईल हे पाहणे गांभीर्याचे असणार आहे.
    Lalit Modi : कोणताच टॅक्स नाही, लोकसंख्या केवळ लाखात….भारत सोडून अशा देशात ललित मोदीने घेतलं नागरिकत्व, कारण काय?

    …शिक्षा झालीच पाहिजे

    आरोपींना ज्या लोकांनी पाठबळ दिलं अशा सर्वांची नावे आरोप पत्रामध्ये येणे आवश्यक आहे, मग ते कितीही मोठे असले तरी त्यांना शिक्षा झालीच पाहिजे.

    Santosh Deshmukh : आरोपींना ज्यांनी पाठबळ दिलं, त्या सर्वांना सह आरोपी करा; बारामतीत देशमुख कुटुंबियांची मागणी

    वैभवी देशमुख काय म्हणाली –

    सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने सांगितले की, सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येत ज्या ज्या आरोपींचा सहभाग आहे, तसेच आरोपींना अभय देणारे, त्यांना मदत करणारे जे राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रातील लोक आहेत, त्यांनाही सह आरोपी करून कठोर शासन झाले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed