Chhagan Bhujbal Meet Somnath Suryawanshi Family in Parbhani : पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची छगन भुजबळ यांनी भेट घेतली. यावेळी सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
Somnath Suryawanshi : मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा छगन भुजबळांसमोर टाहो, केली मोठी मागणी
Santosh Deshmukh : आरोपींना ज्यांनी पाठबळ दिलं, त्या सर्वांना सह आरोपी करा; बारामतीत देशमुख कुटुंबियांची मागणी
सरकारच्या मदतीपेक्षा मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळावा – कुटुंबीय
परभणी येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमाला माजी मंत्री आमदार छगन भुजबळ हे आले होते. यावेळी त्यांनी मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. त्यांच्यासोबत आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे हे देखील प्रमुख उपस्थित होते.
Chalisgaon News: ‘मैत्रिणींनो मस्त जगा, कोणता दिवस शेवटचा असेल…’ मृत्यूपूर्वी विवाहितेची काळीज पिळवटून टाकणारी पोस्ट
यावेळी बोलताना सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने माजी मंत्री आमदार छगन भुजबळ यांना घडलेला सर्व घटनाक्रम सांगितला. पोलिसांच्या अमानुष मारहाणीमुळेच माझ्या मुलाचा मृत्यू झाला असल्याचा दावा मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईने यावेळी केला. तसेच पोस्टमार्टम रिपोर्ट आणि अन्य काही कागदपत्रे देखील यावेळी छगन भुजबळ यांना दाखवण्यात आली. राज्य सरकारने आम्हाला मदत जरी जाहीर केली असली, तरी आम्हाला त्या मदतीपेक्षा मृत सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
Beed News : संतोष देशमुख यांच्या मारहाणीचे फोटो पाहून व्यथित तरुणाचं टोकाचं पाऊल, धनंजय देशमुखांची तरुणांना भावनिक साद
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची या प्रकरणी भेट घेणार – माजी मंत्री छगन भुजबळ
मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नुकत्याच सुरू असलेल्या अधिवेशनामध्ये याप्रकरणी मी आवाज उठवलेला आहे. जसा बीडमध्ये देशमुख कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे, तसाच परभणीमध्ये देखील सूर्यवंशी कुटुंबीयांना न्याय मिळाला पाहिजे अशीच आमची भावना आहे.
Somnath Suryawanshi : मृत सोमनाथ सूर्यवंशीच्या आईचा छगन भुजबळांसमोर टाहो, केली मोठी मागणी
आज मी सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेतली आहे. याविषयी आता मी मुंबईला गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे आणि या प्रकरणांमध्ये लवकरात लवकर न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे माजी मंत्री छगन भुजबळ म्हणाले.

