Devendra Fadnavis on Dhananjay Munde : सीआयडीने संतोष देशमुखप्रकरणी दोषारोपपपत्र दाखल केले आहे. यातून वाल्मिक कराडच याप्रकरणातील मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातच देशमुखांच्या निर्घृण हत्येचे काही फोटो आणि व्हिडिओ माध्यमांसमोर आले. हे पाहून महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राजीनाम्याचे कारण स्पष्ट केले आहे.
टिव्ही ९ मराठीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीसांनी संतोष देशमुख प्रकरण आणि मुंडेंचा राजीनामा यावर भाष्य केले आहे. फडणवीस म्हणाले, ‘ज्यावेळी देशमुखांच्या हत्येची घटना घडली. ज्यावेळी याप्रकरणी मी सीआयडी चौकशी लावली. मी सीआयडीच्या लोकांना सांगितलं की यात कोणताही हस्तक्षेप नसणार. त्यांनी खूप चांगला तपास केला. तर फॉरेन्सिक टीमने जे मोबाईल हरवले होते. जो मोबाईट डाटा डिलीट केला होता. त्यामधील सगळा डाटा आधुनिक तंत्रज्ञानाने पुन्हा मिळवला. हत्येचे जे फोटो समोर आले आहेत. ते कोणीही शोधून काढलेले नाहीत. तो एक दोषारोपपत्राचा भाग म्हणून त्यात नमूद आहेत. आमचा तपासात काहीच हस्तक्षेप नव्हता. ज्यादिवशी दोषारोपपपत्र दाखल झाले, तेव्हाच मला तपासाबद्दल माहिती मिळाली.’
Devendra Fadnavis: आहे का हिंमत? आव्हाड, नेहरुंचा उल्लेख; CM प्रचंड संतापले, मंत्री उभे राहिले; वातावरण तापलं
उज्वल निकमांच्या सरकारी वकील म्हणून नियुक्तीला उशीर का झाला? यावर बोलताना फडणवीसांनी नमूद केले की, ‘याला कारण आहे. प्रॉशिक्युशनच्या नियमानुसार प्रॉशिक्युशन वकील हे दोषारोपपत्रात सहकार्य करुच शकत नाहीत. त्यामुळे ज्यावेळी दोषारोपपपत्र दाखल झाले तेव्हाच त्यांची नियुक्ती केली’
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या कारणावर पहिल्यांदाच फडणवीसांनी भाष्य केले. ‘धनंजय मुंडेंचा राजीनामा योग्यवेळी झाला की अयोग्यवेळी त्याच्या खोलात मी जाणार नाही. राजीनामा पहिल्या दिवशी घ्या किंवा शेवटच्या दिवशी लोकांना बोलायचंय ते बोलणारच. ज्याप्रकारे ही हत्या झाली आहे, हत्येचा जो मास्टरमाईंड आहे तोच जर मंत्र्यांच्या एवढ्या जवळचा असेल तर त्या मंत्र्यांने नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यायला हवा.आता युती आहे तर राजीनामा घेण्यास वेळ लागतो पण य़ा परिस्थितीला खंबीरपणे सामोरं गेलं आहोत. त्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आहे.’ असे फडणवीसांनी स्पष्ट केले.

