Santosh Deshmukh Murder Case Photo: संतोष देशमुख यांना किती निर्दयीपणे मारहाण करुन संपवण्यात आलं याचे काही फोटो सध्या समोर आले आहेत. हे फोटो एवढे भीषण आहेत की ते पाहून कोणाच्याही अंगाचा थरकाप उडेल. संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी त्यांचा किती छळ करण्यात आला हे यात दिसत आहे.
हायलाइट्स:
- संतोष देशमुख हत्या प्रकरणी मोठी बातमी
- संतोष देशमुखांच्या हत्येचे फोटो समोर
- अत्यंत क्रूरमध्ये मारहाण करत हत्या
पाहा ते फोटो
मोकारपंती असा या व्हाट्सअप ग्रुपचं नाव होतं. ज्यामध्ये पाच ते सहा जणांनी संतोष देशमुख यांना कसं मारहाण होते हे पाहिले होतं. फॉरेन्सिककडून हा व्हिडिओ सीआयडीला मिळाल्यानंतर त्याचे छोटे छोटे दहा ते बारा व्हिडिओ तयार झाले आणि त्यातूनच या व्हिडिओमधील व्यक्ती आणि सीआयडीने या प्रकरणात ताब्यात घेतलेली व्यक्ती यांची फॉरेन्सिक तपासणी झाली.
या व्हिडिओतील काही फोटो हे या आरोप पत्रात जोडण्यात आले आहेत. ज्यामध्ये सुदर्शन घुले हा कशा प्रकारे संतोष देशमुख यांना मारहाण करतोय हे आपल्याला पाहायला मिळू शकतात. सगळ्यात वाईट म्हणजे संतोष देशमुख यांचे कपडे काढल्यानंतर कशाप्रकारे त्याना वागणूक दिली हे सुद्धा या फोटोमध्ये दिसत आहे.
व्हिडिओ बनवत असतानाच सुदर्शन घुले त्यानंतर सुधीर सांगळे आणि प्रतीक घुले हे हसत हसत मारहाण करत असल्याचे देखील यामध्ये म्हटले आहे. संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये काही फोटो चार्जशीटमध्ये न्यायालयाला देण्यात आले होते. देण्यात आले तेच फोटो सध्या माध्यमांमध्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

