• Sat. Mar 14th, 2026
    कॉलेजला जाताना भरधाव ट्रकची धडक, अपघातात एकुलता एक लेक गेला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    Jalgaon Accident News : जळगावात भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात कुटुंबातील एकुलता एक लेक गेल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    निलेश पाटील, जळगाव : जळगावात भीषण अपघात होऊन एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. फैसल नेहमीप्रमाणे मित्रासोबत मामुराबाद येथील महाविद्यालयात जाण्यासाठी सकाळी निघाला होता. त्याचवेळी मनोरा जवळच भरधाव ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने फैसलचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत असलेला मित्र जखमी झाला आहे. ही अपघाताची दुर्दैवी घटना शनिवारी घडली.
    Nandurbar News : १३ वर्षीय विद्यार्थीनीचं शाळेच्या वसतिगृहात टोकाचं पाऊल, कुटुंबीयांचा मन हेलावणारा आक्रोश, काय घडलं?
    जळगाव शहरापासून जवळ असलेल्या मामुराबाद येथील अरूणामाई कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयात दुचाकीवरुन जाणाऱ्या दोन जणांना भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने समोरून जोरदार धडक दिली. यात फार्मसी महाविद्यालयातील तरुण जागीच ठार झाला, तर त्याचा सोबतचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. तरुणाच्या मृत्यूनंतर याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. फैसल मुस्ताक पटेल, वय २०, रा. मास्टर कॉलनी, जळगाव असं अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर त्याच्यासोबत वासीक खान युसुफ खान, वय २०, रा. मास्टर कॉलनी जळगाव हा जखमी झाला आहे.
    Crime News : शेजाऱ्यांचा वाद, झाडाला बांधून मारहाण, २० किलो मीठ अन् बॉडी शेतात पुरली; अंगावर काटा आणणारी घटना
    जळगाव शहरातील मास्टर कॉलनीत फैसल पटेल हा तरुण आपल्या आई-वडील आणि मोठे काका यांच्यासोबत वास्तव्याला होता. तो मामुराबाद महाविद्यालयात शिक्षण घेत होता. येथील बी-फार्मसीच्या तृतीय वर्षाला तो शिकत होता. नेहमीप्रमाणे शनिवारी १ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास फैसल त्याचा मित्र वासीक याच्यासोबत दुचाकीने जळगावकडून महाविद्यालयाला जात होता.
    Rahul Gandhi : राहुल गांधी यांना धक्का, न्यायाधीशांचे नाशिक कोर्टात हजर राहण्याचे आदेश, नेमकं प्रकरण काय?

    Jalgaon News : कॉलेजला जाताना भरधाव ट्रकची धडक, अपघातात एकुलता एक लेक गेला; कुटुंबावर दु:खाचा डोंगर

    मामुराबाद आणि जळगाव दरम्यानच्या रस्त्यावरून जात असताना समोरुन विटाने भरलेल्या ट्रकने (क्रमांक – एमएच १३ एएन ४४४५) जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात फैसलचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचासोबत असलेला वासीक हा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर फैसलच्या नातेवाईकांसह मित्रपरिवाराने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात धाव घेतली होती. दरम्यान फैजल हा घरातील एकुलता एक मुलगा असल्याने आई-वडिलांसह त्याच्या नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश आला. लेकाच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed