Devendra fadnavis on yogesh kadam : स्वारगेट बस आगारात २६ वर्षीय मुलीवर शिवशाही बसमध्ये अत्याचार झाला. आरोपीला अटक केली असून गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या विधानावर टीका झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगेश कदम यांना आता मोठा सल्ला दिल्याचे बघायला मिळतंय.
अनेक प्रयत्नानंतर आरोपीला पोलिसांनी अटक केलीये. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी पत्रकार परिषद घेत पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केले नसल्याचे सांगितले होते. मात्र, यादरम्यान त्यांनी एक विधान केले, त्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली जातंय. योगेश कदम यांनी म्हटले की, ज्या बसमध्ये ही अत्याचाराची घटना घडली, त्याच्या आजुबाजूला बरेच लोक उपस्थित होते. मात्र, त्यांना या घटनेचा अलर्ट मिळाला नाही.
Sanjay Raut : गृहराज्यमंत्री दिव्य, शांततेत अत्याचार झाला?, योगेश कदम यांच्यावर संजय राऊतांची जोरदार टीकातिथे कोणतीही हाणामारी, कोणतंही आर्ग्युमेंट, कुठलंही फोर्स, असे काही घडलेले नाही. योगेश कदम यांचे हे बोलणे ऐकून सर्वांनाच धक्का बसला. आता यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिसले आहेत. देवेंद्र फडणवीस म्हणाले, योगेश कदम जे बोलले त्याला वेगळ्या पद्धतीने घेतले गेले. योगेश कदम जे बोलण्याचा प्रयत्न करत होते, त्यांना असे म्हणायचे होते की तो परिसर रहदारीचा आहे. बस काही आतमध्ये नव्हती, बाहेरच होती.
पण लोकांना प्रतिकार होताना लक्षात आले नाही, असा सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तथापि ते नवखे आहेत, तरूण मंत्री आहेत. काही करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी त्यांना एवढा सल्ला देईल की, अशा प्रकरणात बोलताना थोडे संवेदनशील बोलले पाहिजे. बोलताना काही चुकीचे बोलले तर त्याचा समाज मनावर परिणाम होतो. मंत्री असतील किंवा नेते अशा घटनांबद्दल बोलताना संवेदनशील बोलले पाहिजे, असा माझा सर्वांनाच सल्ला असेल.

