Central Railway Mega Block: दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल आणि तीन मेल-एक्स्प्रेस रद्द राहणार असून ४७ मेल-एक्स्प्रेसवर परिणाम होणार आहे. काही मेल-एक्स्प्रेस दादर स्थानकात थांबवण्यात येणार असून त्याच स्थानकातून परतीचा प्रवास सुरू करतील.
हायलाइट्स:
- शुक्रवार/शनिवारी मध्यरात्री ५ तास
- शनिवार रविवारी मध्यरात्री १० तासांचा ब्लॉक
- दोन दिवसीय ब्लॉकमध्ये ५९ लोकल, तीन मेल-एक्स्प्रेस रद्द
पहिला ब्लॉक (पाच तास)
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा
मार्ग – अप आणि डाउन जलद
वेळ – शुक्रवारी रात्री ११.३० ते शनिवारी पहाटे ४.३०
दुसरा ब्लॉक (१० तास)
स्थानक – सीएसएमटी ते भायखळा / वडाळा रोड
मार्ग – अप-डाउन जलद आणि धीमा, अप आणि डाउन हार्बर
वेळ – शनिवारी रात्री ११.१५ ते रविवारी सकाळी ९.१५
शनिवारी या एक्स्प्रेस राहणार रद्द
पुणे-सीएसएमटी डेक्कन
पुणे-सीएसएमटी इंटरसिटी
नांदेड-सीएसएमटी तपोवन
रविवारी या एक्स्प्रेस राहणार रद्द
सीएसएमटी-पुणे डेक्कन
सीएसएमटी-पुणे इंटरसिटी
सीएसएमटी-नांदेड तपोवन
साताऱ्याच्या लेकीची अमेरिकेत मृत्यूशी झुंज; नीलम शिंदेच्या कुटुंबाला अखेर दिलासा, व्हिसा मिळण्याचा मार्ग मोकळा
सीएसएमटी फलाट क्रमांक १२/१३ विस्तारीकरणाच्या ब्लॉकमुळे रविवारी दिवसा मध्य रेल्वेवरील मेगाब्लॉक रद्द करण्यात आला आहे. – डॉ. स्वप्नील नीला, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

