Pune Crime: स्वारगेट एसटी आगारात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना ताजी आहे. या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेच्या मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न पडावा अशा घटना पुण्यात सातत्यानं घडत आहेत.
भारती विद्यापीठ परिसरात एक बार आहे. या बार मालकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न काही गुंडांनी केला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये कैद झाली आहे. बार मालकानं काही गुंडांना हटकलं. त्यावेळी बारसमोर त्यांची गुंडगिरी सुरु होती. त्यानंतर गुंडांनी बार मालकालाच मारहाण सुरु केली. त्यांनी मालकाला बेदम मारलं.
Pune Crime Swargate Depot: घटनेवेळी बसच्या आसपास १० ते १५ जण, पण..; बसमधील अत्याचारावर गृहराज्यमंत्र्यांचा खळबळजनक दावा
मारहाणीत जखमी झालेला बार मालक उपचारांसाठी रुग्णालयात निघाला होता. तेव्हा गुंडांनी त्याला पुन्हा गाठलं. त्याच्यावर पेट्रोल टाकून त्याला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. या घटनेनं परिसरात दहशत पसरली आहे. गुंडांची हिंमत वाढल्यानं सामान्यांचं जगणं अवघड झालं आहे. गुन्हेगारांना कायद्याच, पोलिसांचा धाक उरला आहे की नाही, असा प्रश्न निर्माण करणाऱ्या घटना पुण्यात दररोज घडत आहेत. त्यामुळे कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

