• Mon. Mar 16th, 2026
    लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर PSI ने जीव दिला, डायरी सापडल्याने खळबळ

    पोलिस दलातील अधिकाऱ्याने लोणावळ्याच्या टायगर पॉइंटवर जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांना गाडी आणि डायरी सापडली आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    प्रशांत श्रीमंदिलक, पुणे : पुण्यातील पोलिस अधिकाऱ्याने आपले जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. लोणावळा येथील टायगर पॉईंटजवळ असलेल्या झाडाला पोलीस उपनिरीक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

    अण्णा गुंजाळ असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून ते पुण्यातल्या खडकी पोलीस स्टेशनला कार्यरत होते. घरगुती कारणवरून आत्महत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत . गेल्या काही दिवसांपावून ते कामावर कार्यरत नव्हते. त्यांचा पोलिस दलातील कोणाशीही संपर्क देखील होत नव्हता. मात्र आज त्यांनी जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

    घटनास्थळी आढळली गाडी, डायरी

    लोणावळ्यातील टायगर पोईंटवर या घटनास्थळी अण्णा गुंजाळ यांची क्रेटा गाडी देखील आढळली आहे. पोलिसांनी त्या गाडीचा तपास केला असता त्यात डायरी आढळली आहे. या डायरीमध्ये नेमंक काय लिहिले आहे याचा पोलिस तपास करणार आहे. मात्र सध्यातरी या बाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. या खळबळजनक घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेतली आणि तेथील स्थानिकांच्या मदतीने कारवाई सुरू केली होती. खडकी पोलीस ही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत.

    ११२ क्रमांकावर आला कॉल
    पोलिसांना ११२ क्रमांकावर एक कॉल आला. त्यानंतर तातडीने पोलिस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शिवदुर्ग रेस्कू पथकाच्या मदतीने अण्णा गुंजाळ यांचा मृतदेह खाली उतरवला आणि ताब्यात घेतला. पोलिस या घटनेचा सखोल तपास करत आहेत.

    पोलिसांकडून घटनास्थळी असलेली त्यांची गाडी देखील ताब्यात घेण्यात आली आहे. पुण्यातील या आत्महत्येमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed