• Fri. Mar 13th, 2026
    महिला असल्याचं भासवलं, २४ वर्षांच्या पोराने नवी मुंबईत ५४ वर्षीय बिझनेसमनला ३३ लाखांना लुटलं

    Dating App Scam : पीडित व्यावसायिक घणसोली येथे राहण्यास आहे. मार्च २०२४ मध्ये या व्यावसायिकाने बंम्बल नावाच्या डेटिंग अॅपवर सर्च केले होते. त्यावेळी आरोपी संजय मिना या भामट्याने आपण प्रगती दहिया नावाची महिला असल्याचे भासवून ओळख केली

    महाराष्ट्र टाइम्स

    म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : महिला असल्याचे भासवून नवी मुंबईतील घणसोली येथे राहणाऱ्या ५४ वर्षीय व्यवसायिकाला गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. डेटिंग अॅपद्वारे प्रेमाच्या जाळ्यात ओढून त्याच्याकडून तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये उकळण्यात आले. भामट्याला नवी मुंबई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी देहराडून येथून अटक केली आहे.

    संजय कैलासचंद मिना (२४) असे या भामट्याचे नाव आहे. या उकळलेल्या पैशांतून त्याने महागडी कार विकत घेऊन वेगवेगळ्या राज्यांतील तरुणींवर पैसे उधळल्याचे तपासात आढळून आले आहे.

    काय आहे प्रकरण?

    पीडित व्यावसायिक घणसोली येथे राहण्यास आहे. मार्च २०२४ मध्ये या व्यावसायिकाने बंम्बल नावाच्या डेटिंग अॅपवर सर्च केले होते. त्यावेळी आरोपी संजय मिना या भामट्याने आपण प्रगती दहिया नावाची महिला असल्याचे भासवून ओळख केली. व्यावसायिकाशी मैत्री करत त्याच्याशी चॅटिंगद्वारे संवाद वाढवला होता.

    महिला असल्याचे भासवून प्रेमाचे नाटक

    त्यानंतर मिना याने प्रेमाचे नाटक करुन त्याला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. तसेच त्याने वेगवेगळी कौटुंबिक कारणे सांगून व्यावसायिकाकडून सहानुभूती मिळवित १० मार्च ते ३० जून या कालावधीत तब्बल ३३ लाख ३७ हजार रुपये उकळून त्याची फसवणूक केली होती.
    Pune News : लग्नाला दोन वर्ष, मर्चंट नेव्हीतला नवरा टचही करेना; पुण्यातील विवाहितेने सत्य शोधलं, हादरवणारा प्रकार
    सुप्रसिद्ध अभिनेता आयुषमान खुराना याची मुख्य भूमिका असलेल्या बहुचर्चित ‘ड्रीमगर्ल’ या चित्रपटातील कथानकाप्रमाणे आरोपीने व्यावसायिकाला फसवले. ऑगस्ट महिन्यामध्ये या व्यावसायिकाने नवी मुंबईच्या सायबर पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासाला सुरुवात केली होती. सायबर पोलिसांनी देहराडून
    येथे जाऊन संजयला ताब्यात घेतले.
    Nashik News : अल्पशा आजाराने मुलाचा मृत्यू; काळजाच्या तुकड्याचा निष्प्राण देह पाहिला, अन् माऊलीने डोळे कायमचे मिटले

    सांगलीत चार वर्षीय बालिकेचा खून

    दुसरीकडे, सांगली येथील करजगी (ता. जत) येथे चार वर्षीय चिमुरडीचा गळा दाबून खून केल्याची निर्दयी घटना घडली आहे. मुलीचा मृतदेह एका पेटीत आढळला असून, आरोपीने लैंगिक अत्याचार करून तिचा खून केल्याचा संशय आहे. पांडुरंग सोमनिंग कळळी (वय ४५) असे संशयिताचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. पोलिसांनी जातीय सलोखा अबाधित राहावा म्हणून ग्रामपंचायतीत घेतलेल्या बैठकीत शांततेचे आवाहन केले.

    अनिश बेंद्रे

    लेखकाबद्दलअनिश बेंद्रेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक पदावर कार्यरत | सामाजिक, राजकीय आणि मनोरंजनविषयक बातम्यांमध्ये नैपुण्य | क्राईम विषयाचा ‘मास्टरमाईंड’ | एबीपी माझा, टीव्ही९ मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 11 वर्षांहून अधिक अनुभव… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed