“सगळ्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे. विष्णू चाटेची झाली पाहिजे, सुदर्शन घुलेची झाली पाहिजे, आकाची झाली पाहिजे, या सगळ्यात कुठे आकाचा आका आला तर त्याचीदेखील नार्को टेस्ट झाली पाहिजे”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
“सरकारी वकील उज्ज्वल निकम हे संतोष देशमुख यांची कोर्टात बाजू मांडतील यासाठी त्यांची ऑर्डर निघाली पाहिजे. काही टेक्निकल गोष्टी या प्रकरणात राहू नये. संतोष घुले याचा मोबाईल ओपन झालेला नाही. विष्णू चाटेचा मोबाईल 10 तारखेपासून बंद आहे. या सगळ्या प्रकरणात कुठेही काहीही राहू नये, अशी चर्चा धनंजय देशमुख आणि मी केलेली आहे”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.
‘महादेव मुंडे याचेही मारेकरी सापडले पाहिजेत’
“आका आणि आकाचे सहकारी, कदाचित आकाचा आका यांनी आमच्या संतोष देशमुखवर जो अन्याय केला आहे या सर्वांना फाशी झाली पाहिजे. यासाठी आम्ही प्रत्येक गोष्टीची काळजी घेत आहोत”, असंही सुरेश धस यावेळी म्हणाले. “करुणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. हे मी आधीच सांगितलं होतं. त्या पलिकडे मला काही बोलायचं नाही. त्यांची पहिली असो, दुसरी असो, यावर आम्हाला चर्चा करायची नाही. आमचा फोकस हा संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या केली आहे. आमच्या संतोषला न्याय मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे. महादेव मुंडे याचेही मारेकरी सापडले पाहिजेत”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.
‘अजित पवार आले नसते तर आमचे 100 आमदार जिंकून आले असते’, गुलाबराव पाटील यांचं मोठं वक्तव्य
सुरेश धस नार्को टेस्टबद्दल नेमकं काय म्हणाले?
“संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे माझ्याकडे पुरावे आहेत. मी कागदपत्रे गोळाच करतोय. आम्हाला एसआयटीला बरेच कागद द्यायचे आहेत. अजून तपास प्राथमिक आहे. आता आरोपी अटक झाले आहेत. एखाद्या वेळेस वेळ पडली तर नार्को टेस्ट घेण्याची मागणी आम्ही करणार आहोत. सगळ्यांच्या नार्को टेस्ट झाली पाहिजे. विष्णू चाटेची झाली पाहिजे, सुदर्शन घुलेची झाली पाहिजे, आकाची झाली पाहिजे, या सगळ्यात कुठे आकाचा आका आला तर त्याचीदेखील नार्को टेस्ट झाली पाहिजे. संतोष देशमुखला झुरळासारखा मारला का? काय समजून मारलं? त्याची चूक काय होती?”, असे प्रश्न सुरेश धस यांनी उपस्थित केले.

