करुणा शर्मा आणि धनंजय मुंडे यांचा मुलगा सिशिव मुंडे याची इन्स्टाग्राम पोस्ट आता समोर आली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आईलाच आरोपीच्या पिंजऱ्यात टाकलं आहे. आपल्या आईकडूनच आपला छळ झाल्याचा दावा सिशिव मुंडे याने केला आहे.
सिशिव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. त्याने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “मी सिशिव धनंजय मुंडे आहे. मला माध्यमांसोबत बोलणं आता महत्त्वाचं वाटत आहे. कारण माझ्या कुटुंबाला आता मनोरंजनाचं माध्यम बनवण्यात आलं आहे. त्यामुळे आता मला बोलणं भाग आहे. माझे वडील सर्वोत्कृष्ट नाहीत. पण ते माझ्या आईसारखे आम्हाला हानिकारकही नाहीत”, असं सिशिव आपल्या पोस्टमध्ये सुरुवातीला म्हटला आहे.
सिशिव मुंडे नेमकं काय म्हणाला आहे?
“माझी आई करुणा मुंडे वडील धनंजय मुंडे यांच्यावर कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप करत आहे. करुणा मुंडे जे आरोप करत आहेत तसा त्यांना त्रास नाही. याउलट मी, माझी बहीण आणि वडील धनंजय मुंडे यांना त्रास झालेला आहे. आम्हाला आईकडून त्रास होत आहे”, असं सिशिव मुंडे म्हणाला आहे.
“आमची आई ट्रॉम्याचा सामना करताना आम्हालाच वाईट पद्धतीने त्रास द्यायची. ती कौटुंबिक छळ झाल्याचा जो दावा करते तो खरंतर तिने आमचा म्हणजे मी, बहीण आणि माझ्या वडिलांचा छळ केला. तिने माझ्या वडिलांना मारहाण केली. त्यामुळे वडील घरातून निघून गेले. तिने आम्हालाही निघून जायला सांगत संबंध तोडले. 2020 पासून माझे वडीलच माझी काळजी घेत आहेत. माझ्या आईला कसलीही आर्थिक अडचण नाही. ती माझ्या वडिलांचा सूड घेण्यासाठी काहीना काही बनाव रचत राहते”, असं सिशिव मुंडे म्हणाला आहे.who is Karuna Sharma : कोण आहेत करूणा शर्मा? धनंजय मुंडेंना का द्यावी लागणार पोटगी? जाणून घ्या सविस्तर
“माझे वडील हे सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांसाठी कधीही हानिकारक नव्हते. याउलट आईने जाणीवपूर्वक घराचे हफ्ते भरले नाहीत. त्यामुळे आम्हाला आर्थिक विवंचना आहे, असं त्या दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही आर्थिक विंवचनेत नाहीत”, असं सिशिव मुंडे याने स्पष्ट केलं आहे.