• Wed. Mar 18th, 2026
    ३५ लाखांचं घर २१ लाखांना; एक चूक अन् ठाण्यातील महिलेची मोठी फसवणूक, नेमकं काय घडलं?

    Thane News : ३५ लाखांचे घर २१ लाखांमध्ये देण्याचे प्रलोभन दाखवून, मुंबईतील एका महिलेची सात लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स
    home buy AI photo

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: म्हाडाचे ३५ लाखांचे घर २१ लाखांमध्ये देण्याचे प्रलोभन दाखवून, मुंबईतील एका महिलेची सात लाख ६० हजारांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार ठाण्यात समोर आला आहे. याप्रकरणी ठाणेनगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

    यातील एक आरोपी हा म्हाडामध्ये अधिकारी असल्याचे महिलेला सांगण्यात आले होते. ही महिला मूळची चिपळूणची असून, मुंबईतील ओशिवरा येथे भाड्याच्या घरात राहते. तिच्या पतीचे निधन झाले आहे. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये तिने चिपळूणमध्ये एका राजकीय पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्याची भेट घेतली. माझे स्वतःचे घर नाही. मुलाला काम मिळाल्यास तितकीच मला मदत होईल. घरही घेता येईल. मुलाला अभिनयाची आवड असून, मुलाला काम मिळावे, अशी विनंती महिलेने केल्यानंतर या महिला पदाधिकाऱ्याने तिचे ठाण्यातील एका व्यक्तीशी बोलणे करून दिले. या व्यक्तीला भेटण्याविषयी सांगितले. सुरुवातीला महिलेने त्याला मोबाइलवर संपर्क केला. नंतर त्याची ठाण्यात भेट घेतल्यानंतर त्याने या महिलेला म्हाडाचे ३५ लाखांचे घर २१ लाखांमध्ये घेऊन देण्याचे प्रलोभन दाखवले.
    शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसला भाजपचा शह? पालकमंत्री नसलेल्या १७ जिल्ह्यांबाबत मोठा निर्णय
    कमी किमतीत घर मिळत असल्याने ही महिला तयार झाली. त्याने माझ्या ओळखी असून तुमचे घराचे काम माझा एक मित्र करेल, असेही सांगितले. या आरोपीने साहेबांना पैसे देण्यासह विविध कारणांनी सात लाख ६० हजार रुपये उकळले. बनावट कागदपत्रेही दिली. मात्र, म्हाडामध्ये गेल्यानंतर कागदपत्रे बोगस असल्याचे समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेच्या तक्रारीनंतर तिघांविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल झाला.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed