Dhananjay Munde : राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवलं आहे. करूणा शर्मा यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हिंसाचाराचे आरोप केले होते.
महाराष्ट्र टाइम्स.कॉममुंबई : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने दोषी ठरवलं आहे. करूण शर्मा यांनी केलेले आरोप कोर्टाने मान्य केलेत. त्यासोसबतच न्यायालयाने करूणा मुंडे यांना दरमहा २ लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने धनंजय मुंडे यांना दिले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात होती. आताच धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना २७५ कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर केला गेला आहे. यादरम्याना आता कोर्टाने त्यांना घरगुती हिंसाचार प्रकरणामध्ये दोषी ठरवत धनंजय मुंडेंना दणका दिला आहे.
न्यायालयाचे आभार मानते, आज सत्याचा विजय झालेला आहे. लोकांना वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही. पण मला न्याय भेटलेला आहे. याआधीपण औरंगाबाद न्यायालयामध्येही माझ्या बाजूने निकाल लागला होता. न्यायालय आणि न्यायाधीशांचे आभार मानते. मला आणि माझ्या दोन मुलांना प्रत्येकी ५ लाखांप्रमाणे १५ लाखांची मागणी केली होती. मात्र आम्हाला २ लाखांची पोटगी मिळाली आहे. या मागणीसाठी मी परत हाय कोर्टामध्ये जाणार असल्याचं करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा