खासदार संजय राऊत यांच्या जादूटोणाच्या आरोपांनंतर आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा बंगल्यावर अद्याप राहायला का गेले नाहीत? या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. तसेच वर्षा या शासकीय बंगल्यावर कधी राहायला जाणार? याबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी माहिती दिली आहे.
आपण वर्षा बंगल्यावर अद्याप का निवासासाठी गेलो नाही आणि कधी राहायला जाणार? याबाबत मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मी वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. मुलीची दहावीची परीक्षा संपल्यानंतर वर्षा बंगल्यावर राहायला जाणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर बंगल्याचं काम करुन तिथे राहायला जाणार”, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. त्यामुळे याबाबतच्या वादावर आता पडदा पडल्याची चर्चा आहे.
देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
“एकनाथ शिंदे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर मला तिथे राहायला जायचं आहे. त्यापूर्वी तिथे काही छोटी-मोठी कामे चालू होती. दरम्यानच्या काळात माझी मुलगी दहाव्या वर्गात आहे. येत्या 17 तारखेपासून तिची परीक्षा सुरु होत आहे. त्यामुळे ती म्हणाली की, माझी झाल्यानंतर आपण तिथे शिफ्ट होऊ. त्यामुळे मी वर्षा बंगल्यावर अजून शिफ्ट झालो नाही. परीक्षा झाल्यानंतर तिथे शिफ्ट होईल. पण इतक्या वेड्यासारख्या चर्चा सुरु आहेत. मला तर वाटतं माझ्या स्तरावरच्या माणसाने तर या चर्चांवर उत्तरही देऊ नये”, अशी सविस्तर प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, धनंजय मुंडेंचा खुलासा, पण दमानियांनी GR वाचत…
संजय राऊत यांचे आरोप काय?
संजय राऊत यांनी याबाबत खळबळजनक दावे केले आहेत. कामाख्या देवीला कापलेल्या रेड्याचे शिंग हे वर्षा बंगल्याच्या लॉनमध्ये कापलं आहे, असा खळबळजनक दावा करत संजय राऊतांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जादूटोण्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गटात दोन ते तीन दिवसांपासून हे जादूटोणाचे परस्परांवर आरोप केले जात आहेत. अखेर या वाकयुद्धानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिल्याने आता या वादावर आता पडदा पडण्याची शक्यता आहे.

