भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांनी विविध मुद्द्यावर पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, संजय राऊतला चांगलं काही दिसत नाही. तो ज्या बातम्या देतो त्या सगळ्या खोट्या असतात. उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे चांगलं काम करताहेत. काही दिवस ते गप्प होते.पण पुन्हा कामाला लागले आहेत, त्यामुळे त्याला चांगलं दिसत नसल्याने तो शब्द वापरतो. एक दिवशी त्याला चांगलं बोलायला आम्ही शिकवू, असा टोलाही राणे यांनी यावेळी लगावला.