• Thu. Feb 20th, 2025 5:16:51 PM

    पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत – महासंवाद

    ByMH LIVE NEWS

    Jan 30, 2025
    पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांची ‘दिलखुलास’, ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात मुलाखत – महासंवाद




    मुंबई दि. 30 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन विभागाचा ‘शंभर दिवसाच्या कामकाजाचा आढावा आणि अंमलबजावणी’ या विषयावर पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.

    ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत सोमवार दि. 3, मंगळवार दि. 4, बुधवार दि.5 फेब्रुवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’ या मोबाईल ॲपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 4 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत पाहता येणार आहे. निवेदक संजय भुस्कुटे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

    एक्स – https://twitter.com/MahaDGIPR

    फेसबुक – https://www.facebook.com/MahaDGIPR

    यू ट्यूब – https://www.youtube.co/MAHARASHTRADGIPR

    डिसेंबर महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाजाला सुरूवात झाली. पर्यावरण, वातावरणीय बदल व पशुसंवर्धन विभागाच्या कामकाजाची जबाबदारी या विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सोपविण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शंभर दिवसाच्या अनुषंगाने सर्व विभागांच्या कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी राज्यातील पर्यावरणीय दृष्टीकोनातून अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये ग्लोबल वार्मिंगचे परिणाम कमी करण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना, हरित महाराष्ट्र, निल ध्वज, ब्लु फ्लॅग उपक्रम, नमामि चंद्रभागा व नमामि गोदावरी हे अभियान, तलाव संवर्धनासाठी घेण्यात आलेले निर्णय तसेच अगामी कुंभमेळा च्या अनुषंगाने पर्यावरण दृष्टीने खबरदारी म्हणून कोणत्या उपाययोजना करण्यात येणार आहे अशा महत्वपूर्ण विषयावर या बैठकीत निर्णय घेण्यात आले. या निर्णयांची अंमलबजावणी आणि आराखडा कसा तयार करण्यात आला आहे याविषयी मंत्री श्रीमती मुंडे यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

    0000







    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed