Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील आढे गावातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका शालेय विद्यार्थ्याने वडिलांची बंदूक घेतली आणि डोक्यात झाडून आत्महत्या केली आहे.
ही धक्कादायक घटना माढा तालुक्यातील आढेगाव येथे सोमवारी दुपारी घडली आहे. श्रीधर गणेश नष्टे असे आत्महत्या केलेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आहे. तर घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान श्रीधरने आत्महत्या का केली? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
श्रीधरचे वडील सशस्त्र सीमा बलात कार्यरत
माढा तालुक्यातील आढेगाव येथील रहिवासी असलेला गणेश सदाशिव नष्टे हे सशस्त्र सीमा बल राजस्थान सेंटर येथे इंस्टेस्टर म्हणून नोकरीस आहेत. आढेगाव येथे श्रीधरचे वडील सदाशिव नष्टे, आई सारिका आणि त्याचा भाऊ असे चौकोनी कुटुंब होते. गणेश नष्टे यांच्याकडे परवाना असलेली बंदूक असून ते जेव्हा गावाकडे येतात तेव्हा रिव्हॉल्व्हर त्यांच्याकडे असते. या बंदुकीचं लायन्स हे जम्मू काश्मीरचं आहे.
दुसऱ्या मजल्यावर ठेवलेली रिव्हॉल्व्हर घेतली अन्…
सोमवारी दुपारी साडेबारा वाजण्यापूर्वी घरातील दुसऱ्या मजल्यावरील खोलीमध्ये श्रीधर बसला होता आणि पुढे त्याने अनभिज्ञपणे वडिलांच्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडली. श्रीधर नष्टे याने आत्महत्या कोणत्या कारणास्तव केली हे समजू शकले नाही. घटनेची टेंभुर्णी पोलीस ठाण्यामध्ये नोंद करण्यात आली आहे. या घटनेनं नष्टे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्या हा टोकाचा निर्णय का घेतला याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

