• Sat. Mar 14th, 2026

    अजित पवारांना पुरावे हवेत ना? दादांना भेटून दमानिया फोडणार मोठा बॉम्ब, आमदारकी घालवण्याचा चंग

    अजित पवारांना पुरावे हवेत ना? दादांना भेटून दमानिया फोडणार मोठा बॉम्ब, आमदारकी घालवण्याचा चंग

    Anjali Damania will meet Ajit Pawar : अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि अजित पवार यांना भेटण्यासाठी भेटीची वेळ मागितली आहे. त्यांनी धनंजय मुंडे व वाल्मिक कराड यांच्यातील संबंध आणि Mahagenco शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवणार असल्याचे म्हटले आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई : संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडवर आरोप होत आहेत. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही प्रकरण लावून धरलेलं पाहायला मिळत आहे. कराडविरोधात रोज नवनवीन माहिती समोर आणत आहेत. त्यासोबतच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणीही त्यांनी वारंवार केलेली. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना अजित पवार यांनी पुरावे असल्यावर कारवाई करणार असल्याचं सांगितलं होतं. अशातच अंजली दमानिया आणखी एक मोठा बॉम्ब फोडण्याच्या तयारीत आहेत. अजित पवार यांच्यासोबत ३६ चा आकडा असला तरीसुद्धा त्यांची भेट घेणार आहेत. धनंजय मुंडेंचे मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे, असं अंजली दमानियांनी म्हटलं आहे.

    धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे. अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन, पण बीड चे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थरा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? मग वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत, कसे व्यवहार एकत्र आहेत, धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagenco (Maharashtra State Power Generation Company) शी कसे व्यवहार करत आहेत हे पुरावे दाखवण्यासाठी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे, असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे.

    दरम्यान, अंजली दमानिया यांनी रविवारी संतोष देशमुख यांच्या पोस्ट मार्टम रिपोर्टबाबतही संशय व्यक्त केला होता. थोरात यांची बीडहून नाशिकला बदली केली आणि आता मोठ्या आशिर्वादाने पुन्हा बीडमधे आगमन झाल्याचं दमानिया म्हटलं होतं. या प्रकरणामधील सुदर्शन घुले याला आणखीन ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

    हरिश मालुसरे

    लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed