राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज कोल्हापूर दौऱ्यावर होत्या. यावेळी त्यांनी भाषणादरम्यान शरद पवारांसोबतचा किस्सा सांगितला. त्या म्हणाल्या, माझे आणि कोल्हापूरचे जिव्हाळ्याचे नाते आहे. पवार साहेबांनी निवृत्त होऊन कोल्हापुरात राहावं अशी इच्छा बोलून दाखवली होती. मात्र ते काय निवृत्त होत नाहीयेत, दिल्ली, मुंबई, कोल्हापूर असं सुरुचं आहे.