• Thu. Jan 23rd, 2025
    हॉर्न नाही म्हणून प्रवासी बेसावध! जळगाव रेल्वे अपघातातील प्रत्यक्षदर्शींचा दावा

    Authored byआशिष मोरे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 23 Jan 2025, 9:26 am

    Jalgaon Railway Accident : एका बोगीमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर काही लोकांनी ट्रेनमधून पटापट उड्या मारल्या. दरम्यान, समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. काही कळायच्या आतच, वेगाने येणाऱ्या रेल्वेने अनेकांना चिरडले. समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने हॉर्न वाजवला नाही, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    जळगाव : जळगाव येथील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेसच्या एका डब्यात आग लागल्याच्या अफवेमुळे अनेक प्रवाशांनी घाबरुन ट्रेनमधून उड्या मारल्या. दरम्यान, पलीकडून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. या अपघातात १३ जणांचा मृत्यू झाला तर ४० हून अधिक लोक जखमी झाले. परधाडे रेल्वे स्थानकाजवळ पुष्पक एक्स्प्रेस जात असल्याचे सांगण्यात येत आहे. मोटरमनने ब्रेक लावल्यावर चाकांमधून ठिणग्या निघू लागल्या. त्यामुळे ट्रेनला आग लागल्याची अफवा पसरली. काही वेळातच गोंधळ उडाला आणि प्रवाशांनी भीतीपोटी ट्रेनमधून उड्या मारायला सुरुवात केली.

    ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाने सांगितले की, हा अपघात दुपारी ३.३० ते ४ च्या दरम्यान झाला होता.
    एका बोगीमध्ये आग लागल्याच्या अफवेनंतर काही लोकांनी ट्रेनमधून पटापट उड्या मारल्या. दरम्यान, समोरून कर्नाटक एक्स्प्रेस येत होती. काही कळायच्या आतच, वेगाने येणाऱ्या रेल्वेने अनेकांना चिरडले. समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने हॉर्न वाजवला नाही, असा दावाही काही प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. हॉर्न दिला असता तर प्रवाशी सावध झाले असते.

    युपीच्या मुख्यमंत्र्यांनी रेल्वे अपघातावर शोक व्यक्त केला
    उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल(२२ जानेवारी) झालेल्या पुष्पक ट्रेन दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की, पुष्पक ट्रेन दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. मी मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त करतो. जखमींवर योग्य उपचार झाले पाहिजेत. ते लवकरात लवकर बरे व्हावे अशी माझी इच्छा आहे.

    काय म्हणाले नाशिकचे विभागीय आयुक्त ?
    नाशिकचे विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम यांनी सांगितले की, पुष्पक एक्स्प्रेसचे प्रवासी रुळावर होते. तेवढ्यात कर्नाटक एक्स्प्रेस बाजूच्या ट्रॅकवरून जात असताना अनेक प्रवाशी त्याखाली चिरडले गेले. अतिरिक्त एसपी, एसपी, जिल्हाधिकारी आदी अधिकारी आम्ही घटनास्थळी पोहचून डीआरएम आणि रेल्वे अधिकाऱ्यांशी समन्वय साधला आहे. ८ रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. अतिरिक्त रेल्वे रेस्क्यू व्हॅन आणि रेल्वे रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवण्यात आल्या. प्रशासन सर्वतोपरी मदत करत आहे.

    आशिष मोरे

    लेखकाबद्दलआशिष मोरेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि मानसशास्त्र बातम्यांमध्ये आवड. सायकॉलॉजी मध्ये विशेष अध्ययन.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed