मुंबई दि. 22 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ‘मराठी भाषा पंधरवडा‘ आणि ‘तिसरे विश्व मराठी संमेलन‘ यानिमित्त मराठी भाषा संचालनालयाच्या संचालक विजया डोनीकर यांच्या विशेष मुलाखतीचे प्रसारण होणार आहे.
‘दिलखुलास’ कार्यक्रमात ही मुलाखत शुक्रवार दि. 24, शनिवार दि.25, सोमवार दि. 27 आणि मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी आकाशवाणीच्या सर्व केंद्रावरून व न्यूज ऑन एआयआर’या मोबाईल अॅपवर सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होणार आहे. तर ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 28 जानेवारी 2025 रोजी रात्री 8.00 वा. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रसारित होणार आहे. तसेच महासंचालनालयाच्या समाजमाध्यमांच्या पुढील लिंकवर ही मुलाखत ऐकता येणार आहे. निवेदिका पल्लवी मुजुमदार यांनी ही मुलाखत घेतली आहे.
एक्स – https://twitter.com/MahaDGIPR
फेसबुक – https://www.facebook.com/
यू ट्यूब – https://www.youtube.co/
महाराष्ट्र राज्याची बोली भाषा म्हणजेच ‘मराठी‘ भाषेचे जतन व संवर्धन व्हावे यासाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्न करीत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त व्हावा यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण घेतला. ही तमाम महाराष्ट्रातील जनतेसाठी अभिमानास्पद बाब आहे. मराठी भाषेची महती आतंरराष्ट्रीय स्तरावर पोहोचावी, तिचे महत्त्व वाढावे यासाठी मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम व योजना राबविण्यात येत आहेत. मराठी भाषा वृद्धीगत व्हावी आणि जनमाणसात तीचे महत्व वाढावे यासाठी दरवर्षी जानेवारी महिन्यात 14 ते 28 या कालावधीत ‘मराठी भाषा पंधरवडा‘ चे आयोजन केले जाते. या पंधरवाड्यात कोणकोणते उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचबरोबर दिनांक 31 जानेवारी व दिनांक 1 आणि 2 फेब्रुवारी रोजी ‘तीसरे विश्व मराठी संमेलन‘ आयोजित केले आहे. त्याचे नियोजन कशा प्रकारे करण्यात आले आहे व कोणकोणत्या विषयांवर या संमेलनातून चर्चा करण्यात येणार आहे याबाबत संचालक श्रीमती डोनिकर यांनी ‘दिलखुलास‘ आणि ‘जय महाराष्ट्र‘ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.
०००
जयश्री कोल्हे/ससं/