• Wed. Jan 22nd, 2025

    शिक्षकाला ब्लॅकमेलप्रकरणात तरुणीला जेल, दोन दिवसांनी तुरुंगात भयंकर कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश

    शिक्षकाला ब्लॅकमेलप्रकरणात तरुणीला जेल, दोन दिवसांनी तुरुंगात भयंकर कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश

    Dhule Crime News : धुळ्यातील कारागृहात महिला कैदीने आयुष्य संपवल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर महिला कैद्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केले असून तुरुंगाबाहेर आक्रोश केला.

    Dhule News : शिक्षकाला ब्लॅकमेलप्रकरणात तरुणीला जेल, दोन दिवसांनी तुरुंगात भयंकर कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश

    अजय गर्दे, धुळे : धुळे जिल्हा कारागृहामध्ये एका महिला कैदीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. चंद्रमा बैरागी असं आत्महत्या केलेल्या तरुणीचं नाव आहे. वीस वर्षीय तरुणीने तुरुंगाच्या शेजारी असलेल्या बाथरुमजवळ ओढणीने गळफास घेत आयुष्य संपवलं. या महिलेला दोन दिवसापूर्वीच न्यायालयीन कोठडी मिळाली होती. त्यानंतर तिला धुळे जिल्हा कारागृहात आणण्यात आलं होतं. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली जात असल्याची माहिती कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दुसरीकडे मृत तरुणीच्या नातेवाईकांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहे.
    मोजणीत एक जण कमी अन् घटनेचा उलगडा; १४ फुटांच्या भींतीवर कैद्याला पाहून पोलीसही हादरले

    नेमकं काय घडलं?

    कारागृह अधीक्षक एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला दोन दिवसांपूर्वी देवपूर पोलीस ठाण्याच्या माध्यमातून कारागृहात दाखल झाली होती. मंगळवारी सकाळी तिने महिला विभागातील हॉलच्या मागील बाथरुममध्ये जाण्याचं सांगून, ओढणीच्या साहाय्याने गळफास घेतला. ही बाब लक्षात येताच कारागृह अधिकाऱ्यांनी तात्काळ वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावण्यात आलं. मात्र तोपर्यंत महिलेचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
    बारामती जिल्हा होणार? मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले त्या प्रस्तावाची कुठेही…

    सेक्सटॉर्शन प्रकरणी झालेला तुरुंगवास

    नंदुरबार येथील एका शिक्षकासोबत तरुणीने ऑनलाइन मैत्री केली होती. त्यानंतर त्याला धुळ्यात बोलवून त्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे त्याला ब्लॅकमेल करू लागली. तरुणीकडून शिक्षकाकडे १२ लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. याप्रकरणी शिक्षकाने पोलिसांत तक्रार केली होती. गुन्ह्यात आरोपी महिला आणि इतर चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या या तरुणीला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.

    Dhule News : शिक्षकाला ब्लॅकमेलप्रकरणात तरुणीला जेल, दोन दिवसांनी तुरुंगात भयंकर कृत्य, कुटुंबीयांचा आक्रोश

    तुरुंगात आत्महत्येच्या घटनेनंतर धुळे शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत. न्यायाधीशांच्या उपस्थितीत पंचनामा करण्यात आला आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेची एकच चर्चा आहे. मात्र तरुणीच्या आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबीयांनी पोलिसांवर आरोप केले आहेत.

    करिश्मा भुर्के

    लेखकाबद्दलकरिश्मा भुर्केमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमतसह ४ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. सामाजिक, मनोरंजन विश्लेषणात्मक लेखनाची आवड.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed