युवक कॉंग्रेसचा दणका; शिवानी वडेट्टीवारांसह ६० पदाधिकाऱ्यांची उचलबांगडी, काय कारण?
संघटनेत पद मिळाल्यानंतरही दिलेली जबाबदारी पार न पाडणाऱ्या शिवानी विजय वडेट्टीवार, केतन विकास ठाकरे, अभिषेक अशोक धवड, अनुराग भोयर, सईश वारजूरकर आदी नेतापुत्रांसह तब्बल ६० प्रदेश पदाधिकाऱ्यांची युवक काँग्रेसने हकालपट्टी केली आहे. एक उपाध्यक्ष, आठ सरचिटणीस, ४४ सचिव, एक जिल्हाध्यक्ष आणि सहा विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्षांना नारळ देण्याचे इतके मोठे ‘ऑपरेशन’ बहुधा पहिल्यांदाच झाल्याचे मानले जात आहे.