अभिनेता सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्याला लीलावती रुग्णालयात भरती करणाऱ्या रिक्षाचालकाचे सर्वत्र कौतुक होत असताना आता त्याचा रोख रक्कम देऊन सन्मान केला गेला आहे.
भजन सिंह राणा याने सांगितले की, मी जीवनात कधी असा विचार केला नव्हता की असं काहीतरी होईल, मला माझ्यावर खूप अभिमान वाटत आहे. आज सत्कार झाल्यामुळे खूप छान वाटत. मला चांगलं वाटत आहे की मी कोणाची तरी मदत केली. लोक ज्यावेळी रक्ताच्या थारोळ्यातील व्यक्तीला पाहतात तेव्हा घाबरतात, मलाही एका क्षणासाठी भीती वाटली. यामुळे मी कोणत्या पोलिस प्रकरणात अडकणार तर नाही हा विचारही आला. मात्र त्यानंतर मी मदतीचा विचार केला आणि पुढे सरसावलो. ही गोष्ट मला खूप आनंद देते.
भजन राणाने सैफ अली खानबद्दल सांगितले की, ते ( सैफ अली खान) स्वत:चालत रुग्णालयात गेले. ते खूप धाडसी आहेत. अतिशय गंभीर जखमी झाल्यानंतरही त्यांनी हिंमत दाखवली.राणाने सांगितले की प्रसिद्धीझोतात आल्यानंतर त्याच्या दिनचर्येत खूप बदल झाला आहे. त्यांना अनेक मुलाखती द्यावा लागत आहेत. त्यामुळे ते सध्या रिक्षा चालवणे होत नाही.
रिक्षाचालक भजन सिंह राणा सत्कार करणाऱ्या सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अंसारीने रिक्षाचालकाला रिअल हिरो म्हटले. फैजान म्हणाला की, माझे म्हणणे आहे की भजन सिंह हे रिअल हिरो आहेत. रात्री तीन वाजता त्यांनी रक्ताच्या थारोळ्यातील अभिनेत्याला रुग्णालयात पोहचवले.राणा यांच्या जागी कोणी दुसरा असता तर त्याने पळ काढला असता मात्र त्यांनी हिंमत दाखवत ते काम केले जे लोक करण्यासाठी घाबरतात.
सैफ अली खानच्या हल्लेखोराला पोलिंसानी अटक केली असून त्याला न्यायलयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.