रायगड जिल्ह्यातील फणसवाडी येथे 7 गुरे अज्ञात आजाराने पोट फुगून मृत अवस्था आढळली आहेत. रायगड जिल्हा आणि सुधागड पशुसंवर्धन विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आजाराचे निदान न झाल्याने काही गुरांची प्रकृती बिघडली आहे. ग्रामपंचायतीला गोठ्यातील निर्जंतुकीकरणाचे निर्देश देण्यात आले. रोग प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावात उपाययोजना राबविल्या जात आहेत.
लसीकरण आणि उपाय
सुधागड पशू संवर्धन विभागाने तत्काळ सर्व गुरांना लसीकरण करून जनावरांना बिल्ले मारले, जेणे करून किती गुरे या गावात आहे त्याची नोंद शासनाकडे राहील. आणि त्या प्रमाणे लसीकरण जनावरांना करता येईल आणि एकही जनावर लसीकरण पासून वंचित राहणार नाही. जी गुरे दगावली आहेत त्या गोठ्यात ग्रामपंचायत माध्यमातून फवारणी करून घेणे. आणि तसे सहकार्य ग्रामपंचायतने करावी असे उपस्थित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. तसेच पशुपालकांना जंतनाशक गोळी, कॅल्शियम पावडर, द्रवरूप कॅल्शियम हे औषध वाटप केले. तसेच गावातील लोकांना रोग प्रादुर्भाव अनुषंगाने मार्गदर्शन केले.
जनावर मेल्यानंतर सर्वप्रथम त्याची विल्हेवाट लावणे गरजेच आहे. ज्यावेळेस खनिजाची कमी होते तेव्हा गुरे मेलेल्या जनावरांचे हाड चघळतात. तसेच आता हिरवळ नसल्याने गुरे भुकेच्या अभावी विषारी वनस्पती खातात. त्यामुळेही अस होण्याची शक्यता असू शकते असं पशुधन विकास अधिकारी डॉ.प्रशांत कोकरे यांनी सांगितलं.
फणसावाडी येथे जनावरांची पाहणी केली एकूण 5 जनावरे मृत आढळून आली. त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले असून रोग निदानाकरिता नमुने रोग अन्वेषण विभाग पुणे येथे पाठविण्यात आले आहेत. तसेच दोन आजारी जनावरांना उपचार करण्यात आलेले आहे. गावातील लोकांना रोग प्रादुर्भाव अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले असून खनिज मिश्रण, जंत नाशक गोळ्या, कॅल्शियम द्रव वाटप करण्यात आले. ग्रामपंचायतीला गावातील प्रत्येक गोठा निर्जंतुकीकरण करण्यासाठी फवारणी करण्यासाठी ग्रामपंचायत कर्मचारी यांना सूचना दिल्या. तसेच पुन्हा काही असं वाटलं तर पशुधन विभागाशी तात्काळ संपर्क साधा.