Navi Mumbai Taloja MIDC Car Accident : तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण कार अपघात झाला असून यात एक महिला आणि एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
भीषण अपघात सीसीटीव्हीमध्ये कैद
अपघाताच्या भीषण घटनेने नवी मुंबई हादरली आहे. नवी मुंबईच्या तळोजा एमआयडीसीमध्ये भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका कारने रस्त्यावरुन चालत जाणाऱ्या दोघांना उडवलं आहे. ही घटना रस्त्यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.
मोठी बातमी! अखेर वाल्मिक कराडवर मकोका, न्यायालयाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
महिलेला काही कळायच्या आत कारने उडवलं
नवी मुंबईतील तळोजा एमआयडीसी येथील शिवजागृती हॉटेलसमोर हा भीषण अपघात झाला आहे. भरधाव कारने रस्त्यावरुन जाणाऱ्या दोघांना उडवलं. व्हिडीओमध्ये दिसतंय, की एक महिला आणि एक तरुण रस्त्याच्या कडेने चालत जात आहेत. समोरुन भरधाव कार येत होती. महिलेने कार पाहिली, ती बाजूना होतच होती, त्याचवेळी काही क्षणातच समोरुन येणारी कार महिला आणि एका तरुणाला उडवून पुढे जाते.
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका दाखल झाल्यानंतर संतोष देशमुखांची लेक कडाडली, आाता त्या सर्वांना…
महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू
समोरुन भरधाव येणारी कार महिलेने पाहिली होती. मात्र महिला बाजूला होणार तोपर्यंत काही कळायच्या आत, क्षणभरात कारने महिलेला उडवलं. त्याशिवाय एका तरुणालाही उडवलं. या दुर्घटनेमध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर महिला गंभीररित्या जखमी झाली होती. जखमी महिलेवर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते. महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे.
वाहनचालक वेगाने कार चालवत होता. कार चालवत असताना त्याचं नियंत्रण सुटल्याने वाहन चालकाने त्या दोघांना उडवलं, असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान या अपघाताप्रकरणी तळोजा पोलीस ठाण्यात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तळोजा पोलिसांनी या घटनेचा अधिक तपास सुरू केला आहे. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.