‘बदलापूर’ लैंगिक शोषण खटला जलदगतीने
: बदलापूर लैंगिक शोषण प्रकरणातील पीडित मुली या खूप लहान आहेत. त्यामुळे त्या प्रकरणाचा खटला शीघ्रगती न्यायालयात चालवायला हवा आणि खटल्याची सुनावणीही जलदगतीने पूर्ण व्हायला हवी. त्यादृष्टीने प्रयत्न करा, अशी सूचना मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली.