बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख प्रकरणावरुन सध्या राजकारण तापलं आहे. मस्साजोगमधील ग्रामस्थांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं गेलं. या आंदोलनात संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुखही देखील सहभागी झाले होते.धनंजय देशमुख यांनी स्वत: पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले.पाण्याच्या टाकीवर चढल्यानंतर धनंजय देशमुख यांना ग्लानी आल्यासारखे झाले होते.कालपासून त्यांनी काहीही खाल्लं नसल्याने त्यांना अशक्तपणा आला होता.त्यामुळे काही वेळ ते अस्वस्थ होते. आता तरी प्रशासनाने गांभीर्याने लक्षात देऊन…सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी प्रीतम मोरे यांनी केली आहे.प्रीतम मोरे हे देशमुखांसोबतच आंदोलन करण्यासाठी टाकीवर चढले होते. त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी दिपक जाधव यांनी….