Mumbai Fraud Scheme : ‘प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे ‘टोरेस’ या नावाने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या शहरांमध्ये दागिने, कृत्रिम हिऱ्यांच्या ब्रँड सुरू करण्यात आला.
‘प्लॅटिनम हर्न प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीतर्फे ‘टोरेस’ या नावाने मुंबईसह नवी मुंबई, ठाणे, मिरा भाईंदर या शहरांमध्ये दागिने, कृत्रिम हिऱ्यांच्या ब्रँड सुरू करण्यात आला. यातील गुंतवणुकीबरोबर रोखीने गुंतवणूक स्वीकारून त्यावर दर आठवड्याला पाच ते साडेअकरा टक्क्यापर्यंत परतावा देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच सोमवारी दादर येथील शाखेत गोंधळ उडल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून संचालक सर्वेश सुर्वे, उझबेकिस्तानी नागरिक तानिया (व्यवस्थापक) तर रशियन नागरिक व्हॅलेंटिना स्टोअर (व्यवस्थापक) या तिघांना अटक करण्यात आली. या तिघांच्या उमरखाडी, कुलाबा आणि डोंबिवली येथील घरी तसेच कंपनीच्या मुंबईतील कार्यालयांवर आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकांनी छापे टाकले. तपासाच्या दृष्टीकोनातून महत्त्वाची कागदपत्रे, रोकड तसेच इतर बरेच काही हस्तगत करण्यात आले आहे.
Torres Scam : ‘टोरेस’च्या जाहिरातीचं पॅम्प्लेट वाचलं अन् पोलिसांसमोर धक्कादायक माहिती उघड, एजंट रडारवर; कोट्यवधींची रोकड, कृत्रिम खडे अन्…
Pune BPO Accountant Murder : नाही रे, कसलं आजारपण? शुभदाच्या बाबांनी खरं सांगितलं, कृष्णाची धुसफूस, पुण्यातील हत्येमागे ‘कराड’ कनेक्शन
एजंटवर नजर
‘टोरेस’मधील गुंतवणूकदारांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळींना माहिती दिली. या सर्वांनी माहिती देणाऱ्यांच्या माध्यमातून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. गुंतवणुकीनुसार त्याला कमिशन मिळू लागले. असे अनेक एजंट मध्यस्थ असून त्यांनी कमिशन म्हणून लाखो रुपये मिळवले आहेत. हे एजंटही पोलिसांच्याही रडारवर आहेत.
Nashik News : नाशिकची ३६ वर्षीय विवाहिता, पदरात दोन लेकरं, १५ वर्षांच्या मित्रासोबत मुंबईला पळून आली, ‘त्या’ क्षणी समजलं की…
विशेष कक्ष
गुंतवणूकदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याने त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांचा एक कक्ष शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात सुरू करण्यात आला आहे. या ठिकाणी मुंबईमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांकडून अर्ज भरून घेतले जात आहेत, अशी माहिती संग्रामसिंग निशाणदार यांनी दिली.