• Mon. Jan 6th, 2025
    आमदार चढले ट्रकवर; आशिष देशमुख यांचे छापे, वाळू-सडक्या सुपाऱ्यांची तस्करी करणाऱ्यांना अडविले

    Ashish Deshmukh: वाळू, सडकी सुपारी, तंबाखू व इतर प्रतिबंधित वस्तूंची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे करण्यात आली. याआधारे त्यांनी शुक्रवारी रात्री केळवद परिसरातून संशयास्पद जाणारे ट्रक अडवले.

    महाराष्ट्र टाइम्स
    ashish deshmukh

    म.टा.विशेष प्रतिनिधी, नागपूर: मध्य प्रदेशातून येणारी सडकी सुपारी आणि सावनेर भागातील अवैध वाळू तस्करीविरोधात सत्तारुढ भाजपचे आमदार डॉ. आशिष देशमुख यांनी मोर्चा उघडला. प्रादेशिक परिवहन विभाग, पोलिस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाच्या संयुक्त कारवाईत ते आघाडीवर होते.

    वाळू, सडकी सुपारी, तंबाखू व इतर प्रतिबंधित वस्तूंची अवैध वाहतूक होत असल्याची तक्रार डॉ. आशिष देशमुख यांच्याकडे करण्यात आली. याआधारे त्यांनी शुक्रवारी रात्री केळवद परिसरातून संशयास्पद जाणारे ट्रक अडवले. ओव्हरलोड ट्रकवर ते स्वत: चढले. त्यांनी पोत्याला चिरा मारताच सडकी सुपारी बाहेर पडून लागली. जड वाहनांची तपासणी केली असला त्यात वाळू, सडकी सुपारी व इतर संशयास्पद वस्तू मिळाल्या. त्यांनी तत्काळ पोलिस तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाला सूचना केली. अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व कारवाई केली.
    सावधान! ज्येष्ठ महिलांभोवती ‘डिजिटल अटके’चा फास; निवृत्त प्राध्यापिकेसह तिघींची तीन कोटींची फसवणूक
    मध्य प्रदेशातील सावळी मार्गाने अवैध वाहतूक सातत्याने सुरू आहे. रॉयल्टी, टोल वाचवणे, क्षमतेहून अधिक मालवाहतूक या अवैध बाबी सुरू आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील अंतर्गत रस्तेही खराब करण्याचे काम वाळू व सुपारी माफिया करत आहेत. रस्त्यांऐवजी सर्वत्र खड्डे झाले आहेत. याबाबत पोलिसांनी सूचना केली असता त्यांनी तातडीने टोळीच्या मुसक्या आवळण्यासाठी कंबर कसली. सडक्या सुपारीप्रमाणेच तंबाखूदेखील आणला जात असल्याचा संशय आहे. तस्करी व अवैध धंद्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले. स्थानिक नागरिकांच्या जिवाला धोका आहे. टोळ्यांचे अवैध धंदे चव्हाट्यावर आणण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. आणखी किती टोळ्या सक्रिय आहेत, याची माहिती घेण्यात येणार आहे.
    शुश्रूषा करण्यासाठी नेमलं पण केअरटेकरने केला घात; ८० वर्षीय वृद्धासोबत भयंकर कृत्य, हात-पाय दोरीने बांधले अन्…
    सडकी सुपारी नागरिकांच्या आरोग्यासाठी अपायकारक आहे. तंबाखू, गुटखा व पानमसाला प्रतिबंधित असताना मोठ्या प्रमाणात तस्कारी होण्याची शक्यता आहे. अशा टोळ्यांचा पर्दाफाश करण्यासाठी पोलिसांसह अन्न व औषध प्रशासनाला सखोल चौकशी करावी, अशी सूचना केली आहे, असे आशिष देशमुख यांनी सांगितले. देशमुख ट्रकवर चढल्यानंतर सडकी सुपारी बाहेर पडताच उपस्थित कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. विविध घोषणा देत कार्यकर्त्यांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली. सावनेर, कन्हान, रामटेक आदी भागांत वाळूतस्करांना राजाश्रय असल्याची स्थिती आहे. वाळूतस्करांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा विद्यमान मुख्यमंत्री व तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान कन्हान येथील प्रचारसभेत दिला होता.
    पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष; सातारा जिल्ह्यात सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची ३६ लाखांची फसवणूक, प्रकरण काय?
    झालेत ‘सुपर ॲक्टिव्ह’
    सावनेर विधानसभा मतदारसंघातून विजयी होताच डॉ. आशिष देशमुख ‘सुपर ॲक्टिव्ह’ झाले आहेत. पाटणसावंगी येथे टोलनाका हटवण्याची मागणी करणारे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला दिले. हिवाळी अधिवेशन काळात कळमना बाजारात बैठक घेतली होती. सावनेर नगरपालिकेचा विकास आराखडा व पाणीपुरवठा योजनेबाबत मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावली. खापरखेडा औष्णिक वीज केंद्रात स्थानिकांना रोजगार मिळावा, यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

    किशोरी तेलकर

    लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट म्हणून कार्यरत असून पत्रकारितेमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. ऑनलाइन माध्यमांमध्ये फ्रीलान्सिंगचा २ वर्षांचा अनुभव आहे आणि आता मटा ऑनलाइनमध्ये आहे. जनरल बातम्यासोबतच गुन्हेगारीविषयक बातम्यांमध्ये रस.… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed