नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील पांगरी गाव टोमॅटोची पांगरी म्हणून ओळखलं जातं.या गावातील शेतकऱ्यांवर टोमॅटोने भरलेल्या उभ्या पिकांवर रोटाव्हेटर फिरविण्याची वेळ आलीय.पिकलेल्या टोमॅटो वर पांढरे डाग पडत असल्याने बाजारात टोमॅटो दोन रुपयाला प्रति किलो विकावे लागत आहे.या गावातील साठ ते सत्तर शेतकऱ्यांचा सुमारे तीस ते चाळीस लाखांचा लागवडी खर्च व सुमारे दीड ते दोन कोटींच्यावर उत्पन्नावर पाणी फेरले आहे. या आर्थिक फटाक्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.