नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली आहे. आज ३१ डिसेंबर रोजी साई मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर खुल असणार आहे.सरत्या वर्षाला निरोप देऊन नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साई दरबारी….भाविकांची मांदियाळी पाहायला मिळत आहे. पायी पालख्या शिर्डीत दाखल झालेत. सोबतच साई संस्थान प्रशासन साई भक्तांच्या सेवेसाठी सज्ज झालं आहे.मागील सात दिवसापासून शिर्डीत गर्दीचा ओघ कायम आहे. साई समाधी मंदिराला आकर्षक फुलांची सजावट आणि रंगबेरंगी विद्युत रोषणाई केलीये. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मोबीन खान यांनी…