सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण तपासाला गती मिळाली आहे.सीआयडीनं ज्योती जाधव या महिलेची तब्बल चार तास चौकशी केली.ज्योती जाधव या वाल्मिक कराड यांच्या पत्नी असल्याचा दावा संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुखांनी केला.धनंजय देशमुख यांनी वाल्मीक करण्याचा पत्नीचे नाव घेत त्यांची चौकशी सुरु असल्याचं सांगितलं.याआधी वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिरी कराड यांची देखील चौकशी करण्यात आली होती.