मोदी सरकारकडून अपमान; डॉ.मनमोहनसिंग यांच्यावरील अंत्यसंस्कारावरुन राहुल गांधी यांचा आरोप
‘स्मृतिस्थळाऐवजी निगमबोध घाटावर माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्यावर अंत्यसंस्कार करून केंद्र सरकारने त्यांचा अपमान केला आहे,’ असा आरोप काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शनिवारी केला. ‘एक्स’ या समाजमाध्यमावर केलेल्या पोस्टमधून राहुल यांनी सरकारच्या निर्णयाविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली. भाजपने मात्र या टीकेची संभावना घाणेरडे राजकारण अशी केली आहे. माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या कन्या यांनीही आपल्या वडिलांबाबत काँग्रेस कसा वागला होता, याची आठवण करून देऊन खडे बोल सुनावले.