PM Awas Yojana: महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.’ अशी पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर काली आहे.
मुंबई :
केंद्र सरकारने सोमवारी (23 डिसेंबर) महाराष्ट्रातील जनतेला केंद्र सरकारने सोमवारी (२३ डिसेंबर) प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मोठी भेट दिली. महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत मंजूर करण्याची घोषणा करण्यात आली होती. या घोषणेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले.इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर
‘महाराष्ट्रासाठी २० लाख नवीन घरांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मंजुरी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांचे आभार.’ अशी पोस्ट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या इंस्टाग्रामवर शेअर काली आहे.
महाराष्ट्रात गरिबांसाठी ६३७०८९ घरे बांधण्यात याणार
केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, “पात्र ग्रामीण कुटुंबांना मूलभूत सुविधांसह पक्की घरे बांधण्यासाठी मदत करणे” हा या योजनेचा उद्देश आहे. ९ ऑगस्ट २०२४ रोजी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. ग्रामीण भागातील वाढत्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी २ कोटी अतिरिक्त घरे बांधण्यासाठी ही योजना आणखी पाच वर्षे मार्च २०२९ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
२०२४-२५ या आर्थिक वर्षात केंद्र सरकारने अंतिम मंजूर अर्थसंकल्पातून महाराष्ट्रासाठी ६,३७,०८९ घरांची तरतूद केली आहे. चौहान यांनी म्हटले आहे की, “मला तुम्हाला कळविण्यात आनंद होत आहे की, भारत सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाने तुमच्या राज्यासाठी(महाराष्ट्रासाठी) २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत १३,२९,६७८ घरांचे अतिरिक्त लक्ष्य मंजूर केले आहे.
भारत सरकारच्या, देशातील ग्रामीण भागात सर्वांसाठी घरे उपलब्ध करून देण्यासाठी वचनबद्धतेच्या दिशेने हे एक महत्वाचे पाऊल आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी तुमच्या राज्याकरीता एकत्रित लक्ष्य १९,६६,७६७ घरांचे असेल. PMAY-G च्या तुमच्या राज्यात यशस्वी अंमलबजावणीसाठी या मंत्रालयाच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करण्यासाठी मी ही संधी घेऊ इच्छितो. असे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण आणि ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी यासंदर्भात जारी केलेल्या एका पत्रात म्हटले आहे.