नांदेड येथे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. जितेंद्र आव्हाडांनी चव्हाणांच्या दिल्लीतील भाजपच्या आंदोलनातील सहभागावरून टीका केल्यानंतर चव्हाणांनी प्रत्युत्तर दिले. चव्हाण म्हणाले की, शंकरराव चव्हाणांचा अपमान आव्हाडांच्या नेत्यांनी केला होता. त्यांनी आव्हाडांच्या निष्ठेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. चव्हाणांवर टीका करणाऱ्या सुषमा अंधारेंनाही त्यांनी उत्तर दिले.
आव्हाड यांनी टीका टीका केली होती, त्यावर चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले.
शंकराव चव्हाण हे हयात असताना आव्हाडांच्या नेत्यांनी कसा अपमान केला हे मला सांगायची गरज नाही. मराठवाडातल्या सर्व जनतेला सर्वश्रुत आहे. शंकरराव चव्हाण यांना राजकारणामध्ये त्रास देण्याचं काम त्यांनी आणि त्यांच्या नेत्यांनी केलं होतं. असा आरोप करत अशोक चव्हाण यांनी शरद पवार यांच्यावर निशाना साधला.
दरम्यान व्हायरल फोटो वरून चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिले. भाजपने दिल्ली मध्ये जे आंदोलन केलंय, ते बाबासाहेबांच्या विषयी आदर ठेऊन इतिहासात जे वास्तव आहे, तेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडलं आहे. त्यामुळे कुठल्याही गोष्टींचा विपर्यास करून अश्या पद्धतीने लोकांमध्ये गैरसमज निर्माण करणे अयोग्य आहे अस देखील खासदार अशोक चव्हाण म्हणाले. शिवाय आव्हाड हे आगोदर कुठे होते राष्ट्रवादीमध्ये नंतर आले त्यांची काय भूमिका होती ,निष्ठेच्या बाबतीत त्यांनी मला शिकवण्याची गरज नाही असा टोला देखील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आव्हाडांना लगावला.
शंकररावजी अशोक चव्हाण यांना माफ करा तुम्हाला काय यातना होतं असेल हे आम्ही समजू शकतो.काँग्रेसची विचारधारा असलेल्या अशोक चव्हाण यांच्यावर काय दिवस आले आहे असा ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केला होता. दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील तो फोटो ट्विट करत अशोक चव्हाण यांच्यावर निशाणा साधला.खायायाचं कुडव्याचं आणि गायायचं उडव्याचं अशी टीका सुषमा अंधारे यांनी केली. त्यावर देखील अशोक चव्हाण यांनी प्रतिउत्तर दिले. प्रत्तेक गोष्टीला उत्तर दिलेच पाहिजे असं काही गरजेचं नाही ,माझ्यावर काही बोलून त्यांना काही मिळवायचं असेल तर त्यांनी जरूर मिळवाव पण त्यासाठी माझ्या नावाचा उपयोग करायची गरज नाही असं खा अशोक चव्हाण म्हणाले. त्या फोटो वरुन ट्रोल केल जात का असं विचारलं असता , चालेल राजकरणात असं होत राहते असं चव्हाण म्हणाले