• Fri. Sep 4th, 2026

हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Dec 21, 2024
हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित – महासंवाद




नागपूर, दि. २१ : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन सोमवार दि. 3 मार्च 2025 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती.

विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत केलेली 4 विधेयक विधानसभेत संमत करण्यात आली. तसेच सभागृहात नियम 293 अन्वये एकूण प्राप्त सूचना 1 असून 1 सूचना मान्य करण्यात आल्या. अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड. नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

०००







Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed