बीडमधील सरपंच संतोष देशमुख प्रकरणाने राजकीय वातावरण तापले आहे. देशमुखांना न्याय मिळावा अशी मागणी प्रकाश सोळंके देखील करत आहेत. आरोपींना फाशीची शिक्षा दिल्यास देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल असे सोळंके म्हणाले. मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्याविषयी देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. मंत्रिमंडळात संधी मिळाली नसली तरी मी नाराज नाही असे सोळंकेंनी म्हटले. माजलगावच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.