• Mon. Mar 16th, 2026
    Breaking News 17th December 2024: वाचा मंगळवार १७ डिसेंबर २०२४ च्या सर्व ब्रेकिंग न्यूज आणि महत्त्वाच्या बातम्या एकाच ठिकाणी

  • 09:43 AM, Dec 17 2024

    काँग्रेसने ओबीसींवर अन्यायच केला, विरोधकांनी राजकारण करू नये; मुख्यमंत्र्यांचं जोरदार प्रत्युत्तर

  • 09:19 AM, Dec 17 2024

    २० डिसेंबर रोजी सांगली आणि सोलापूर जिल्ह्यातील काही भागात हलक्या स्वरूपात पाऊस पडण्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज पुणे परिसरात पुढील तीन दिवस आकाश निरभ्र राहून धुके पडण्याची शक्यता तर, १९ आणि २० डिसेंबरला आकाश ढगाळ राहण्याची शक्यता

  • 09:19 AM, Dec 17 2024

    राज्यात सर्वत्र थंडीचा जोर वाढलेला असतानाच अवकाळी पावसाचा इशारा येत्या चार दिवसात राज्याच्या काही भागात तुरळक पावसाचा इशारा १९ डिसेंबर रोजी कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर घाटमाथा परिसरात पावसाचा अंदाज

  • 09:18 AM, Dec 17 2024

    ‘सरकार हव्या त्या विषयावर चर्चेसाठी तयार आहे. विरोधकांनी उगाच राजकारण करू नये’, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी विरोधकांना दिले.

  • 09:18 AM, Dec 17 2024

    काँग्रेसला ओबीसींवर बोलण्याचा अधिकार नाही. त्यांनी ओबीसींवर कायमच अन्याय केला. राज्यातील पहिले ओबीसी मंत्रालय माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात झाले. ओबीसींसाठी पीएचडी तसेच विदेशी शिक्षणाची व्यवस्था आम्ही केली आहे. ओबीसींना संवैधानिक दर्जा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. त्यांना वैद्यकीय शिक्षणातील आरक्षण मोदींनी दिले. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये सर्वाधिक ओबीसी मंत्री आहेत, असं म्हणत फडणवीसांनी विरोधकांवर टीका केली.

  • 09:16 AM, Dec 17 2024

    महायुतीचे सरकार आल्यास लाडक्या बहिणींना १५०० रुपयांवरून २१०० रुपये देणार अशी घोषणा निवडणुकीपूर्वी करण्यात आली होती. आता लाडक्या बहिणींच्या आशीर्वादाने सत्ताही आली. मात्र, वाढीव निधी प्राप्त करण्यासाठी लाडक्या बहिणींना अर्थसंकल्पापर्यंत म्हणजे मार्च २०२५पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

  • Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *