• Sat. Aug 15th, 2026

राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात केला मातृत्वाचा सन्मान !

ByMH LIVE NEWS

Dec 15, 2024
राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात केला मातृत्वाचा सन्मान !




मुंबई दि. १५ : महाराष्ट्राच्या मातीत अनेक थोर वीरांगणांनी जन्म घेतला असून, त्यांच्या कर्तृत्वाने आणि त्यागाने या भूमीला अभिमान मिळवून दिला आहे. या थोर माता-भगिनींच्या उपकारांची जाणीव ठेवत महाराष्ट्राने नेहमीच महिलांचा सन्मान राखला आहे. आजही नागपूर येथे राज्य मंत्रिमंडळातील मंत्री व राज्यमंत्री यांनी शपथविधी सोहळ्यात मातृत्वाचा सन्मान केला आहे.

राज्य शासनाने चौथे महिला धोरण लागू करून एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. या धोरणाअंतर्गत शासकीय कागदपत्रांवर आता आईचे नाव बंधनकारक करण्यात आले आहे. ही फक्त नियमांची अंमलबजावणी नसून मातृत्वाचा सन्मान आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी दृष्टिकोन प्रकट होणारा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. विशेष म्हणजे, राज्य मंत्रिमंडळाच्या शपथविधी समारंभात माननीय मंत्र्यांनी आणि राज्यमंत्र्यांनी शपथ घेताना आपल्या नावासोबत वडिलांआधी आईचे नाव प्राधान्याने घेतले. या कृतीने महाराष्ट्राने देशभरात मातृत्वाचा सन्मान जपण्याचा प्रयत्न केला आहे. मातृत्वाचा सन्मान जपण्याचा हा दृष्टिकोन महाराष्ट्राच्या सामाजिक विकासासाठी प्रेरणादायी ठरेल.







पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण – महासंवाद
“हर घर तिरंगा” मोहिमेअंतर्गत बाईक रॅलीचे आयोजन; पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा रॅलीत सहभाग – महासंवाद
बीड जिल्ह्यातील सामाजिक समस्या सोडविण्यासाठी स्वतः पुढाकार घेणार – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार – महासंवाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed