• Wed. Jan 1st, 2025
    भाजप, सेनेतून जोरदार विरोध; तरीही ‘तो’ नेता पुन्हा मंत्रिपदी; चर्चा १७०० कोटींच्या कामांची

    Cabinet Expansion: फडणवीस सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार आज नागपुरात संपन्न झाला. एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नागपूर: फडणवीस सरकारचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत मंत्रिमंडळ विस्तार आज नागपुरात संपन्न झाला. एकूण ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. महायुतीच्या मंत्रिमंडळातून ११ जणांना डच्चू देण्यात आलेला आहे. तर तब्बल २५ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आलेली आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला राजभवनात शपथविधी सोहळा संपन्न झाला.

    शिवसेनेकडून आज ११ जणांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. शिवसेनेचे प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तानाजी सावंत, अब्दुल सत्तार, दीपक केसरकर यांना डच्चू दिला. तानाजी सावंत, अब्दुल सत्तार यांच्यासह संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये, अशी भाजपची आग्रही मागणी होती. वादग्रस्त, आरोप असलेले चेहरे मंत्रिमंडळात नको, अशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अट होती. पण तरीही संजय राठोड मंत्रिपद टिकवण्यात यशस्वी झाले आहेत.टीम फडणवीस! ३९ जणांचा शपथविधी; २५ नवे चेहरे, ११ जणांना डच्चू, पाहा मंत्र्यांची संपूर्ण यादी
    केवळ आश्वासनं देतात, कामं करत नाहीत, असा पवित्रा घेत शिवसेनेच्या बहुतांश आमदारांनी ५ माजी मंत्र्यांविरोधात थेट भूमिका घेतली होती. दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये, अशी सेना आमदारांची मागणी होती. यातील भुसे, पाटील. राठोड यांनी मंत्रिपद टिकवलं आहे.

    आता शिवसेना, भाजपच्या रडारवर असलेले संजय राठोड महाविकास आघाडी सरकारमध्येही मंत्री होते. एका मुलीच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात त्यांच्यावर गंभीर आरोप झाले. विशेष म्हणजे हे आरोप भाजपकडून करण्यात आले. त्यावेळी भाजपनं राठोड यांचा राजीनामा घेतला होता. आता फडणवीस मुख्यमंत्री असताना, स्वच्छ चारित्र्याचे मंत्री हवेत, असा आग्रह त्यांच्याकडून होत असतानाही राठोड यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
    सही रे सही! शपथविधीआधी शिंदेंनी घेतल्या भावी मंत्र्यांच्या स्वाक्षऱ्या; नेमकी कोणती खबरदारी?
    ठाकरे, शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या संजय राठोड यांनी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी स्वत:च्या मतदारसंघासाठी १७०० कोटी रुपयांची कामं मंजूर केली होती. स्वपक्षीय आमदारासंह भाजपनंही राठोड यांचा पत्ता कापण्यासाठी फिल्डींग लावली होती. त्यानंतर राठोड यांनी महाराष्ट्र, राजस्थानातून त्यांच्या समाजाचे बाबा, बुवा, महंत मुंबईत आणले. त्यांच्या माध्यमातून मंत्रिपदासाठी लॉबिंग केली. त्या लॉबिंगला यश आल्याचं आता म्हणता येईल.

    कुणाल गवाणकर

    लेखकाबद्दलकुणाल गवाणकरमहाराष्ट्र टाईम्स ऑनलाईनमध्ये सिनियर डिजिटिल कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. ११ वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. सकाळ, जय महाराष्ट्र, टीव्ही ९ मराठी, लोकसत्ता ऑनलाईन, न्यूज१८ लोकमत, लोकमत ऑनलाईनमधून प्रवास करत मटा ऑनलाईनपर्यंत वाटचाल; क्राईमच्या बातम्यांमध्ये हातखंडा; राजकीय, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed