Santosh Deshmukh Murder Case : बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे ९ डिसेंबर रोजी अपहरण करून हत्या करण्यात आली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एका काळ्या रंगाच्या स्कार्पिओने त्यांच्या कारचा पाठलाग केल्याचे दिसून येत आहे. टोलनाक्याजवळ हल्ला करून त्यांचे अपहरण करण्यात आले आणि अमानुष मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला. पाच दिवस उलटून गेले तरी आरोपी अद्याप फरार आहेत. ग्रामस्थांनी न्यायाची मागणी केली आहे.
तोष देशमुख हे केज हून मसाजोग कडे निघाले होते. रस्त्यात टोल नाक्याजवळ एक काळया रंगाची स्कार्पिओ त्यांच्या कारचा पाठलाग करत होती. टोलनाका परिसरातच त्यांच्यावर हल्ला झाला त्यानंतर त्यांचा अपहरण करण्यात आलं. अमानुष्य मारहाणीत त्यांचा अखेर मृत्यू झाला. मृत्यू होण्यापूर्वी त्यांच्या कारचा पाठलाग करताना चा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. या व्हिडिओत सुरुवातीला एक पांढऱ्या रंगाची कार जाताना पाहायला मिळते. त्यानंतर लगेचच दहा सेकंदात दुसरी काळया रंगाची स्कार्पिओ गाडी त्यांचा पाठलाग करताना या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. हा सर्व खेळ अवघ्या चार मिनिटात झाला. अपहरण करून भरधाव वेगाने पुन्हा काळा रंगाची स्कार्पिओ केज च्या दिशेने जाताना या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे.
९ डिसेंबरला भरदिवसा संतोष देशमुख यांच हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष विष्णू चाटे आणि जयराम माणिक, महेश केदार, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे यांचा आरोपी म्हणून समावेश आहे. या आरोपींमधील जयराम, महेश आणि प्रतीक हे तीन आरापी ताब्यात असून इतर चार आरोपी फरार आहेत.
दरम्यान, संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये केजचे पोलीस अधीक्षक प्रशांत महाजन यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. तर त्यांच्या जागी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्याकडे पदभार सोपवला गेला आहे. पोलीस फरार आरोपींच्या मागावर असून त्यांचा शोध घेत आहेत.