Authored byसूरज सकुंडे | महाराष्ट्र टाइम्स.कॉम13 Dec 2024, 7:41 pm
नाशिकमध्ये महानुभाव पंथ आणि वारकऱ्यांनी ईव्हीएमला विरोध केलाय. आज नाशिकमध्ये ईव्हीएम विरोधात महानुभाव पंथ आणि अखिल भारतीय वारकरी विकास मंडळानं विराट मोर्चा काढला. ईव्हीएम हद्दपार करा, पुढची निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, अशी मागणी त्यांनी केलीये. या मोर्चादरम्यान ईव्हीएमची प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. पाहूया, या विराट मोर्चाची खास दृश्ये…