• Tue. Sep 22nd, 2026

शरद पवार आणि अजित पवार भेटीवर सुनंदा पवारांचे सूचक विधान, मूठ गठ्ठ असेल तर…

शरद पवार आणि अजित पवार भेटीवर सुनंदा पवारांचे सूचक विधान, मूठ गठ्ठ असेल तर…

पुण्यात सुनंदा पवार यांनी अजित पवार आणि शरद पवार यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. त्यांनी ही भेट कौटुंबिक प्रसंग म्हणून पाहिली असून, सर्व गैरसमज विसरून अजितदादा शरद पवारांना आशीर्वाद देण्यासाठी आल्याचे म्हटले आहे. मतभेद असले तरी कुटुंब एकत्र राहणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे : दिल्लीमध्ये शरद पवार यांच्या वाढदिवसाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या नेत्यांसह भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय वर्तुळात पवार पुन्हा एकत्र येणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अजित पवारांनीही वाढदिवसानिमित्त भेट घेतल्याचं सांगितलं असलं तरी चर्चा मात्र वेगळीच होताना दिसत आहे. अशातच शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी केलेल्या सूचक विधान केले आहे. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी या भेटीवर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

मी अजित पवार आणि शरद पवारांच्या भेटीकडे कौटुंबिक प्रसंग या दृष्टीकोनातून पाहते. शरद पवारांसाठी महत्त्वाचा दिवस होता, ८५ वर्षे त्यांना सुरू झालं आहे. सगळ्यांनी मनातील गैरसमज असतील ते विसरून आशीर्वाद घेण्यासाठी अजितदादा, रोहित, सुनेत्राताई तिथे आले होते, मला वेगळं काही वाटत नाही. वाढदिवसामुळे दोघांना एका ठिकाणी भेटता आलं. दरवर्षी आम्ही त्यांना वाढदिवशी भेटत असल्याचं सुनंदा पवार यांनी म्हटलं आहे.
केंद्राकडून दादांना ऑफर? शरद पवारांचे 5 खासदार फोडा, मग तुम्हाला…’; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
कसंही वागले तरी टीका तर होतेच. तो मीडियाचा एक विषय होऊन जातो. दादा कसेही बोलले, वागले, कोणालाही भेटले की बातमी होते. पण मला त्यामध्ये काही दिसत नाही. कुटूंबामध्ये मतभेत असतात. महाराष्ट्राच काय देशामध्ये असं कुटंब नाही ज्यांच्यात मतभेत नाही. मतभेद मिटल, तीभविष्यामध्ये एकत्र येऊ शकतात. पण एकत्र यायला पाहिजे असं मला वाटतं. पण शेवटी साहेबांचा निर्णय आहे. मी नाही सांगू शकत की त्यांनी काय कराला पाहिजे. मूठ गठ्ठ असेल तर ताकद राहते आणि आपण विखुरलेले राहू तर ताकद कमी होते. त्यामुळे एकत्र राहणं जास्त महत्त्वाचं राहिल. दादा आणि साहेबांनी तो निर्णय घ्यायला पाहिजे, असं सुनंदा पवार म्हणाल्या.
Sanjay Raut : शरद पवार भाजपसोबत जाणार का? संजय राऊतांनी स्पष्ट सांगितलं, मी दिल्लीमध्ये…
दरम्यान, नवे उमदे आमदार निवडून आले आहेत. ज्यांचे विचार शिक्षण आणि वेगळी विचारधार आहे. या मुलांना संघटनेच्या कामाची जबाबदारी मिळाली तर पक्ष वेगाने उभारायला मदत होईल असं सुनंदा पवारांनी सांगितलं.

हरिश मालुसरे

लेखकाबद्दलहरिश मालुसरे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. क्रीडा, राजकीय आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. झी 24 तास आणि टीव्ही9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 04 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed