Carnac Bridge Mumbai: दुसरा गर्डर स्थापित करून कर्नाक उड्डाणपूल ५ जून २०२५पर्यंत वाहतुकीसाठी खुला करण्याची प्रयत्नशील असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले.
दक्षिण मुंबईतील मशिद बंदर, सीएसएमटी आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी कर्नाक पूल महत्त्वाचा आहे. लोकमान्य टिळक मार्गावरील कर्नाक पूल धोकादायक झाल्यामुळे मुंबई महापालिकेने या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम हाती घेतले आहे. या कामाच्या ठिकाणी मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी गुरुवारी भेट देऊन पुलाच्या कामाचा आढावा घेतला.
नववर्ष, नाताळसाठी कोकण, गोव्याला जाण्याचं प्लॅनिंग करताय? ‘या’ मार्गावर धावणार स्पेशल ट्रेन्स, वाचा Timetable
या पुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काही सुटे भाग प्रकल्प ठिकाणी दाखल झाले असून, काही भाग २० डिसेंबरपर्यंत दाखल होणार आहेत. १३ जानेवारी २०२५ पर्यंत गर्डरच्या सुट्या भागांचे जोडकाम केल्यानंतर १८ आणि १९ जानेवारीला मध्य रेल्वे प्रशासनाकडे ब्लॉक मिळवण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. ब्लॉक उपलब्ध होताच १९ जानेवारीपर्यंत गर्डर स्थापित करण्याची कार्यवाही पूर्ण केली जाणार आहे.
भाजपचे संभाव्य मंत्री ठरले! अमित शहा यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
पुलाच्या पूर्व आणि पश्चिम दिशेकडील पोहोचमार्गाच्या बांधणीसाठी खांब बांधणीचा पहिला टप्पा १५ मार्चपर्यंत पूर्ण केला जाईल. त्यानंतर ३ मे पर्यंत पोहोच रस्त्यांचे कॉंक्रीटीकरण आणि १ जूनला लोड टेस्ट करण्याचे नियोजन केले आहे. ही सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर ५ जून २०२५पर्यंत कर्नाक पूल वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पुलाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर क्रँश बँरियर्स, विजेचे खांब उभारण्याकामी होणारा वेळ टाळण्यासाठी ही कामे समांतरपणे पूर्ण केली जाणार आहेत.