Cabinet Expansion: महायुतीचं सरकार स्थापन होऊन ६ दिवस उलटले आहेत. पण अद्याप तरी मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. कॅबिनेट विस्तार रखडल्यानं सध्या सत्ताधारी आमदारांची, इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
भाजपच्या वाट्याला २०, शिवसेनेच्या वाट्याला १२, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला १० मंत्रिपदं जाऊ शकतात. शिवसेनेकडून इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्यातच आता काही माजी मंत्र्यांना पुन्हा मंत्रिपद मिळण्याची शक्यता धूसर झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलहाचा फटका पाच माजी मंत्र्यांना बसू शकतो. तसं झाल्यास ५ जणांना पुन्हा संधी मिळणार आहे. याचा अर्थ निम्म्या मंत्र्यांना डच्चू मिळेल.
Cabinet Expansion: महायुतीत खातेवाटपाचा तिढा, सोडवण्यासाठी ‘जुना’ फॉर्म्युला; शिंदेंना आवडतं खातं मिळणार, पण…
माजी मंत्री दीपक केसरकर, अब्दुल सत्तार, दादा भुसे, गुलाबराव पाटील, संजय राठोड यांच्या विरोधात शिवसेनेतच तक्रारीचा सूर आहे. मंत्र्यांकडे कोणतीही कामं घेऊन गेल्यावर केवळ आश्वासनं मिळतात. कोणतंही काम मार्गी लागत नाही, अशा तक्रारी पाच मंत्र्यांविरोधात आहे. त्यामुळे या पाच जणांना मंत्री करण्यास शिवसेनेच्या आमदारांचा विरोध आहे. त्यामुळे त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वाढली आहे.
याबद्दल शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पक्षाची भूमिका मांडली. मंत्र्यांविरोधात काही तक्रारी एकनाथ शिंदेंकडे गेल्या असतील, तर ते याबद्दल निर्णय घेतील. मंत्रिमंडळात कोणाला स्थान द्यायचं याबद्दलचे सर्वाधिकार आम्ही शिंदेंना दिले आहेत. त्यामुळे याविषयी निर्णय घेण्याचा सर्वस्वी अधिकार त्यांचा आहे. त्यावर मी भाष्य करणं योग्य नाही, असं शिरसाट म्हणाले.
Navneet Rana: नवनीत राणांचं पुनर्वसन होणार; भाजपचा बडा नेता राज्यात पुन्हा येणार? ‘एक्स्चेंज प्लान’ चर्चेत
संजय राठोड, अब्दुल सत्तार यांच्या नावांना भाजपचादेखील विरोध आहे. मंत्री असताना त्यांच्यावर आरोप झाले होते. त्यामुळे असे नेते मंत्रिमंडळात नको. कॅबिनेटमध्ये स्वच्छ चेहरे असावेत, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही आहेत. आता सत्तार, राठोड यांच्याविरोधात त्यांच्याच पक्षातून तक्रारी असतील, तर त्यांना मंत्रिमंडळापासून दूर ठेवणं भाजपसाठी अधिक सोपं होणार आहे. शिवसेना आमदारांचाच विरोध भाजपच्या पथ्थ्यावर पडेल.