• Thu. Mar 12th, 2026

    बस थांबली, संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण, ‘ही’ व्यक्ती नसती तर संजय मोरेचा जीव गेला असता

    बस थांबली, संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण, ‘ही’ व्यक्ती नसती तर संजय मोरेचा जीव गेला असता

    Kurla Accident Bus Driver Sanjay More: कुर्ल्यात बेस्टच्या बसने अनेकांना फरफटत नेलं, अनेक गाड्यांना धडक दिली. या अपघातात सात जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना पाहून संतप्त झालेल्या जमावाने चालक संजय मोरेला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    मुंबई: कुर्ल्यात बेस्ट बसच्या अपघातात सात जणांचा आपला जीव गमवावा लागला तर ४९ जण जखमी झाले आहेत. सोमवारी रात्रीच्या सुमारास ३३२ क्रमांची कुर्ला-अंधेरी या बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने भरधाव वेगात येत अनेकांना चिरडलं. या अपघातानंतर कुर्ला एलबीएस मार्गावर एकच गोंधळ माजला. कोणाला काही कळायच्या आत या बसने अनेक लोक आणि गाड्यांना धडक दिली होती. जेव्हा ही बस थांबली तेव्हा सगळीकडे रक्ताचा सडा पडलेला होता. या अपघातानंतर जमाव खूप संतप्त झाला. बस थांबताच त्यांनी चालक संजय मोरेला बसमधून खाली उतरवलं आणि त्याला धक्काबुक्की, मारहाण करण्यास सुरुवात केली.

    रस्त्यावर पडलेले मृतदेह, जखमी लोक पाहून जमाव संतप्त झाला आणि जमावाने संजय मोरेला मारहाण करण्यास सुरुवात केली. जमाव इतका रागात होता की त्याने संजय मोरे यांचा जीव घेतला असता. मात्र, एका व्यक्तीमुळे संजय मोरेचा जीव वाचला. एका वकिलाने आपल्या जीवाची पर्वा न करता जमावाचता रोष सहन करत संजय मोरेला वाचवलं. तसेच, तिथे उपस्थित असलेल्या पोलिसाच्या प्रसंगावधानामुळे संजय मोरे जमावाच्या तावडीतून सुटू शकला. तर, बसचा वाहन एका दाताच्या दवाखाण्यात जाऊन लपून बसल्याने तोही बचावला आहे.
    Kurla Accident: पैसे नकोत, कारवाई करा; माझी आई… कुर्ला अपघाताने सारे हिरावून नेलं, लेकाचं दु:ख पहावेना
    कुर्ला एलबीएस मार्गावर भरधाव वेगाने येत या बसने सात जणांचा जीव घेतला. त्यानंतर ही बस एका प्रवेश द्वाराच्या कमानीला जाऊन आदळली आणि थांबली. काही क्षणात या बसमुळे एलबीएस रोडवर मृत्यचं तांडव घडलं. सर्वत्र रक्ताचा सडा पडलेला होता. जखमी लोक विव्हळत होते, तर काहींनी जागीच जीव सोडल्याने त्यांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. हे सारं पाहून परिसरातील लोक खूप संतापले. त्यांनी संजय मोरेला बसखाली उतरवले आणि बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तसेच, वाहक सिद्धार्थ मोरेही गर्दीच्या हाती लागला. तेवढ्यात एक वकील आसिफ हुसेन हे गर्दीत शिरले आणि त्यांनी संजय मोरेला पकडलं, त्यांनी संजय मोरेला जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला आणि कसेबसे पोलिसांच्या गाडीपर्यंत पोहोचवलं.

    तेवढ्यात संधी साधून वाहक हा एका दाताच्या दवाखान्यात जाऊन लपला. त्यानंतर आसिफ यांनी सिद्धार्थ मोरेला वेगळे कपडेही दिले, ते कपडे घालून त्याला बाहेर काढलं आणि त्याचा जीव वाचला.

    Kurla Accident: बस थांबली, संतप्त जमावाकडून ड्रायव्हरला मारहाण, ‘ही’ व्यक्ती नसती तर संजय मोरेचा जीव गेला असता

    यावेळी या अपघातात जखमी झालेले पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण यांनीही आपण जखमी आहोत हे विसरुन संजय मोरेला जमावाच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण गस्तीवर असताना या बसने फरफटत आणलेली रिक्षा त्यांना येऊन धडकली आणि ते जखमी झाले. तरी, प्रशांत चव्हाण यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात फोन करुन घटनेची माहिती दिली आणि अतिरिक्त पोलिसांना बोलावून घेतलं. त्यानंतर संजय मोरे आणि सिद्धार्थ मोरे या दोघांनाही ताब्यात घेतलं.

    नुपूर उप्पल

    लेखकाबद्दलनुपूर उप्पलनुपूर उप्पल, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहेत, याआधी टीव्ही ९ मराठी, साम टीव्ही, इन मराठी वेबसाईटसाठी काम केलंय. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ७ वर्षांचा अनुभव. राजकीय, सामाजिक लिखाणाची आवड. गुन्हेगारीसंबंधित, विज्ञानविषयक बातम्यांमध्ये हातखंडा… आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *